रामराव आव्हाड
ग्रामीण प्रतिनिधी, पाचलेगाव
जिंतूर : तालुक्यातील भोगाव देवी येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला होता त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री कलगुंडे सर यांच्या अध्यक्षतेखाली वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला असून त्यावेळी राज भैया आव्हाड यांनी, वृक्षारोपणाबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असे म्हणत होते “मनात एकच आस वृक्ष लागवडीचा ध्यास”बोलून विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले त्यावेळी ते म्हणाले वृक्ष जगली तरच या पृथ्वीतलावरची मानव जात आणि अन्य पशु पक्षी हे जगतील आणि त्यांनी मार्गदर्शन करत असताना हे पण सांगितले की प्रत्येकाने वृक्षाची लागवड ही केलीच पाहिजे कारण मानवी जीवनाला जीवन जगत असताना ऑक्सिजनची गरज लागते. आणि झाडे लावा झाडे जगवा अशी घोषणा करत राज भैया आव्हाड यांनी वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेऊन आणि त्यांनी वृक्षाबद्दल अत्यंत छान माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली. आणि त्यावेळी वृक्षारोपण कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले जिल्हा परिषद माध्यमिक शाळा भोगाव शाळेचे मुख्याध्यापकआर बी कलगुंडे सर तसेच डब्ल्यू आर राठोड सर एच एच काळबांडे सर ए बी जाधव सर सतीश हरारे बबलू डोंबे माऊली पुंड तसेच शिक्षकेतर कर्मचारी आधी उपस्थित होते.


