सय्यद रहीम रजा
तालुका प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड यवतमाळ जिल्हा परिषद अंतर्गत जलधारा योजनेतून उमरखेड तालुक्यातील नागापूर (रूपाळा) येथे पिण्याच्या पाण्याचे टाके होत आहे.पण या पिण्याच्या पाण्याच्या टाक्याचे बांधकाम निष्कृष्ट दर्जाचे होत असून त्यामध्ये गाळयुक्त रेती, गिट्टी तसेच हलक्या कंपनीच्या सिमेंट आणि कमी एम. एम. चा गज वापरून टाक्याचे बांधकाम निष्कृष्ट हे दर्जाचे सुरू आहे.या बांधकामाची चौकशी करून दोशींवर योग्य ती कारवाई करावी. अशी तक्रार निवेदन शाम धुळे जिल्हा कार्याध्यक्ष भीम टायगर सेना) यांनी केली आहे. सदर प्रकरणाची आठ दिवसात चौकशी करावी..! अन्यथा सामाजिक संघटना भिम टायगर सेनेतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी. यावेळी तक्रारकर्ते शाम धुळे, कैलास कदम (तालुका अध्यक्ष भीम टायगर सेना उमरखेड), संदीप विनकरे, सिद्धार्थ दिवेकर (शहराध्यक्ष भीम टायगर सेना उमरखेड) हे उपस्थित होते.