राजपाल बनसोड
तालुका प्रतिनिधी दिग्रस
दिग्रस : तालुक्यातील ग्रामपंचायत महागाव येथे दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत मंजूर व सुरू असलेले समाज मंदिराचे काम राजकीय दोषा पोटी इतरत्र हलविल्याबाबत ग्रामपंचायत व पंचायत समिती स्थरावर सुरू असलेल्या हालचाली लक्षात येताच गावातील समाज बांधव व सामाजिक कार्यकर्ते अनिल इंगोले यांच्या वतीने पंचायत समिती कार्यालय दिग्रस यांना ४ डिसेंबर २०२५ रोजी आमरण उपोषण करत असल्याबाबतचे निवेदन दिले आहे. सदर काम हे ७ लक्ष रुपयाचे समाज मंदिराचे काम करणे या कामास प्रशासकीय मान्यता मिळून
कार्यरंभ आदेश देण्यात आलेला आहे. सदर काम हे दलित वस्ती सुधार योजनेत असल्यामुळे शासनाच्या नियमानुसार हे काम दलित वस्तीमध्येच करावयाचे आहे असे शासनाचे निकष असताना गावातील काही मंडळी राजकीय द्वेषापोटी सदर प्रशासकीय व तांत्रिक मान्यता प्राप्त होऊन सुरू असलेले काम इतरत्र हलवण्याच्या मनसुब्यात आहेत. सदर काम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या खुल्या जागेत करण्याची समाजबांधवांची इच्छा असताना व तसा ग्रामपंचायत ठराव घेतलेला असताना समाज मंदिर गावामध्ये इतरत्र हलवीविण्याच्या मार्गावर आहेत हे समाज मंदिर समाजाच्या कामासाठी सर्व बौद्ध समाजासह इतर समाजातील भविष्यातील विविध समारंभ लग्न समारंभकरण्याकरिता सुकर होणार असल्यामुळे मोजक्या जातीवादी व राजकीय लोकांचा हेतू असलेल्या जळकपट्टीपणामुळे हा प्रकार सुरू आहे असे झाल्यास ४ डिसेंबर २०२५ रोजी गुरुवार पासून आम्ही आमरण उपोषणात बसत आहोत यावेळी उद्भवणाऱ्या परिणामास आपण माननीय गटविकास अधिकारी साहेब पंचायत समिती दिग्रस व ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत महागाव हे सर्वस्वी जबाबदार राहतील असे दिलेल्या निवेदनात नमूद आहे.











