मनीष ढाले
ग्रामीण प्रतिनिधी फुलसावंगी
बुधवारी सकाळी सात वाजताच्या दरम्यान महागाव तालुक्यातील काळी टेंभी रस्त्यावर वालतुर करून महागाव कडे येणाऱ्या बसचा आणि कापूस वाहतूक करणाऱ्या बोलेरो पिकपचा धडक लागून अपघात झाला. अपघातात एसटी महामंडळ मधील प्रवासी किरकोळ जखमी झाली आहे. दैव बलवत्तर म्हणून प्रसंगी कुठलीही जीवितहानी झाली नाही. बुधवारी सकाळच्या दरम्यान धोक्याच्या वातावरणात एसटी महामंडळची बस क्र. एम. एच. 40/ 5119 आणि फुलसांगवीकडे कापूस वाहतूक करणाऱ्या महिंद्रा पिकपचा अपघात झाला. यावेळी एसटी ड्रायव्हर पंजाब मोहन राठोड यांनी महागाव पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.अपघाताची माहिती मिळताच महागाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनराज निळे यांच्या मार्गदर्शनास पोलीस ताफा घटनास्थळी दाखल झाला. जखमी झालेल्या प्रवाशांना प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले.उपचारानंतर प्रवाशांना सुट्टी देण्यात आली. याबाबत सविस्तर माहिती अशी की वालतुर मार्गे फुलसांगी महागाव- पुसदकडे जाणाऱ्या एसटीचा आणि महिंद्रा पिकप मधून कापसाची वाहतूक करणाऱ्या वाहनाचा दाट धुक्यामुळे बुधवारी सकाळी 26 नोव्हेंबर रोजी सात ते आठच्या दरम्यान अपघात झाला. धुक्यामुळे समोरासमोर धडक बसून एसटी मधील अनेक प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. ही घटना टेंभी फाट्याजवळ घडली आहे. फुलसांगवी कडे कापूस घेऊन जाणाऱ्या बोलेरो वाहनाच्या चालकाने धुक्यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने फुलसांगवी कडून येणाऱ्या पुसद वालतुर या एसटी बसला समोरासमोर धडक बसली. धडक इतकी जबरदस्त होती की, महिंद्रा पिकप वाहन उलटून यामध्ये महिंद्रा पिकपचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तर एसटी महामंडळ बसचे पण नुकसान झाले. दोन्ही वाहन चालकांना मोठी इजा झाल्याचे पोलीस सूत्रांकडून समजते. सध्या हिवाळ्याचे दिवस असल्याने धुक्यामध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. या घटनेतील जखमींना उपचार करून डिस्चार्ज देण्यात आला. अपघाताचे वृत्त महागाव पोलीस स्टेशनला माहीत होताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात भरती केल्याचे कळते.











