आनंद मनवर
जिल्हा प्रतिनिधी रायगड
पनवेल – दिनांक 16 नोव्हेंबर 2025 रोजी रायगड जिल्हा शिक्षकेतर माध्यमिक आणि उच्चमाध्यमिक सेवक संघाची बैठक शिक्षण प्रसारक माध्यमिक विद्यालय सवाद धारवली ता. पोलादपूर जिल्हा. रायगड येथे दुपारी 12:30 ला संपन्न झाली. या सभेला शिक्षकेतर संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष श्री.मिलिंद जोशी, कार्याध्यक्ष श्री.अशोक उमरटकर तसेच सरकार्यवाह श्री. संजय खडे सर उपस्थित होती. त्या वेळी संघटनेच्या विविध कामावर चर्चा करण्यात आली. त्या वेळी जिल्ह्यातील विविध शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सदरच्या वेळी पनवेल तालुका कार्यकारणी गठीत करुन पनवेल तालुका मोठा असल्यामुळे आणि प्रशासकीय क्षेत्र सुद्धा मोठे असल्याने तालुक्याला अजुन एक अध्यक्ष हवा अशी चर्चा करण्यात आली. त्या वेळी सर्वानुमते निर्णय घेऊन शिक्षकेतर संघटने मध्ये कार्यरत आणि सतत धडपडणारे तरुण तडफदार असे व्यक्तिमत्व असलेले श्री. संतोषजी पाटील यांचे नाव पुढे करण्यात आले. आणि सर्वानुमते त्यांची पनवेल तालुका अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. संतोष पाटील सर यांच्या नियुक्ती मुळे तालुक्यात शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. सदर नियुक्ती वेळी सर्व सेवकांनी त्यांच्यावर शुभेच्छा चा वर्षाव केला. पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांनी संघटनेच्या कार्याची माहिती देऊन सभा संपवली.










