व्येकटेश चालुरकर
तालुका प्रतिनिधी अहेरी
अहेरी : राजे धर्मराव हायक्सुल, नागेपल्ली येथे शनिवारला इयत्ता 10 विच्या विद्यार्थ्यासाठी इयत्ता 9 वीच्य विद्यार्थ्यांनी आयोजित निरोप समारंभ पार पडला. निरोप समारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक मधूकर वांढरे तर प्रमुख पाहुणे म्हणून सतीश पणगन्टिवार,(लक्ष्य अकॅडमी संचालक,अहेरी), आश्विन मडावी, सागर गाऊत्रे, विनोद दहागावकर तसेच शाळेतील ज्येष्ठ शिक्षक जाधव, जनार्दन झाडे, बोधे उपस्थित होते. या कार्यक्रमात मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात गडचिरोली येथील मॅरॅथॉन स्पर्धेत प्रथम क्रमांक आलेल्या इयत्ता 7 विच्या कु. निकीता मडावीचा सत्कार करण्यात आला. तसेच 10 वी च्याविद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेटवस्तू म्हणून शाळेला दिली. यावेळी इयत्ता 10 वीच्या अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेतील आठवणींना उजाळा दिला व गमती सांगितल्या.या कार्यक्रमासाठी इयत्ता 9 वीच्या विद्यार्थ्यांसह शाळेतील सर्व शिक्षक तसेच गद्देवार, गाडगे, पिपरे सर्व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. संचालन विशाल बंडावार तर आभार आशिष बोरूले यांनी केले.