व्येकटेश चालुरकर
तालुका प्रतिनिधी अहेरी
अहेरी : ग्राम सफाई व स्वच्छताचा संदेश संत गाडगेबाबा यांनी प्रत्यक्ष कृतीत उतरून जनतेला दिला. त्यामुळे त्यांच्या जयंतनिमित्त विद्यार्थि व नागरीकांना सफाई संदेशाची प्रेरणा मिळावी म्हणून आज अहेरी तालुक्यात राजाराम केंद्रातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा छल्लेवाडा येथे उपक्रमशील शिक्षक सुरजलाल येलमुले यांनी संत गाडगेबाबा यांची वेशभूषा परिधान करून शालेय विद्यार्थ्यांच्या व गुरूजनांच्या सहकार्याने गावात स्वच्छता अभियान राबविण्यात आला. यावेळी सर्वांनी रस्त्यांवरील केरकचरा झाडून काढला. रस्ता चकाचक करून गावातील नागरीकांना संतांचा सफाई संदेश कृतितून केला. स्वच्छतेतून संमृद्धीकडे हा संत गाडगेबाबा यांचा हेतू होता,तोच हेतू पुढे न्यावे व स्वच्छतेचे महत्त्व विद्यार्थ्यांना कळावे असा होता असे वेषांतर करून बाकी मुलांना प्रेरणा देणाऱ्या शिक्षकाने व्यक्त केले. त्यानंतर परिपाठाच्यावेळी पटांगणात संत गाडगेबाबा यांच्या जयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.सर्वांनी माहिती दिली व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. लगेच ऋषी सुखदेवे यांच्या नेतृत्वातील तालुका पत्रकार संघटना,अहेरी यांचेकडून मिळालेल्या शालेय साहित्य व नोटबुकांचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. देव हा माणसात आहे.त्यामुळे सर्वांनी माणसाशी माणसासारखे वागावे हे ध्येय मनात व वर्तनात निश्चीत ठरविण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षा कल्पना रागीवार मुख्याध्यापिका, सुरजलाल येलमुले, बापू आत्राम, बाबुराव कोडापे,मुसली जुमडे व सर्व शालेय विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार अजय लावडे या विद्यार्थ्यांने केले.