नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे देवरावदादा भोंगळे मित्रपरिवाराचे आवाहन.
दिनेश झाडे
चिफ ब्युरो विदर्भ
कोरपना : कोरपना, दि. २५ देवरावदादा भोंगळे मित्रपरिवार तथा आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी(मेघे) यांच्या संयुक्त आयोजनातून उद्या रविवार, दि. २६ मे रोजी कोरपना येथील श्रीकृष्ण सभागृहात भव्य महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये जवळपास सर्वच प्रकारच्या आजारांचे निदान, उपचार व शस्त्रक्रिया निःशुल्कपणे करून देण्यात येणार आहे. अशी माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे. सदर शिबीर सकाळी ०९ वाजेपासून सुरू होणार असून याठिकाणी आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी (मेघे) येथील मेडिसीन, नेत्ररोग, सर्जरी, बालरोग, स्त्रिरोग, कान-नाक-घसा, अस्तिरोग आणि त्वचारोग यांसारख्या रोगांवरील तज्ञ डॉक्टरांची उपस्थिती राहणार असून याठिकाणी सर्व चाचण्या व मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत करून देण्यात येणार आहे. त्यासाठी शिबीरात येणाऱ्या नागरिकांनी आधारकार्ड व केशरी किंवा पिवळे रेशनकार्ड सोबत आणावे असे आवाहन ही देवरावदादा भोंगळे मित्रपरिवाराने केले आहे.