महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती,दि.२०:-नुकत्याच चंद्रपूर येथे जिल्हा क्रीडा संकुलात पार पडलेल्या जिल्हा स्तरिय शालेय क्रीडा स्पर्धेत येथील लोकमान्य विद्यालयाच्या १७ वर्षांखालील मुलींचा क्रिकेटचा संघ विजयी ठरला असून तो आता विभाग स्तरावर चंद्रपूर जिल्ह्यचे प्रतिनिधीत्व करणारे आहे.चंद्रपूर येथील जिल्हा स्तरिय अंतिम सामन्यात आक्सापुर गोंडपिपरी तालुका संघाला पराभूत करीत भद्रावतीच्या लोकमान्य विद्यालयाच्या संघाने विजयश्री खेचून आणली.विजेत्या मुलींच्या क्रिकेट संघात अमोली गेडाम, अवंतिका नागोसे, उमादेवी आस्वले, जान्हवी बोरीकर, धनश्री डाहुले, नव्या मानकर, प्रणाली देवगडे, प्रिया ढेंगळे, भावना आडेकर, यशस्वी आस्वले, रिया देवगडे, श्रावणी बोम्मावार, तन्वी खुटेमाटे, रेहाना शेख इत्यादी खेळाडूंचा समावेश
आहे.या विजयी खेळाडूंचे लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत गुंडावार, सचिव नामदेवराव कोल्हे, सहसचिव अमित गुंडावार, शाळा समितीचे अध्यक्ष उल्हास भास्करवार, लोकसेवा मंडळाचे सदस्य गोपाळराव ठेंगणे, प्राचार्य सचिन सरपटवार, उपप्राचार्य रुपचंद धारणे, पर्यवेक्षक प्रफुल्ल वटे, क्रीडा विभाग प्रमुख विशाल गावंडे, रवींद्र नंदनवार, सचिनकुमार मेश्राम, प्रिया भास्करवार, सायली झाडे, साक्षी मेंढे आणि सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंदाने अभिनंदन केले आहे.


