सुदर्शन मंडले
ग्रामीण प्रतिनिधी आळेफाटा
डिंगोरे : येथील ग्रामविकास मंडळ ओतूर संचलित पुष्पावती विद्यालयातील सर्व विद्यार्थी व विद्यार्थीनींसाठी गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे शरदचंद्र पवार आँफ फार्मसी काँलेजच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत आज शुक्रवार [ दि.20] रोजी रक्तगट तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. शारदीय नवरात्रौत्सवाच्या सहाव्या दिवशी विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.प्रतिक अकोलकर यांनी केंद्रशासनाच्या आदेशानुसार सर्वच विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी व्हावी याकरिता शरदचंद्र पवार आँफ फार्मसी काँलेजचे प्राचार्य मा.दामा सर यांचेबरोबर संपर्क केल्यानंतर अगदी काही क्षणात प्राचार्य दामा सरांनी ही विनंती स्विकारत आपल्या महाविद्यालयाचे 25 प्रशिक्षणार्थींचे युनिट या शिबीरासाठी उपलब्ध करुन दिले. याप्रसंगी विद्यालयातील इयत्ता पाचवी ते दहावी या वर्गातील सर्वच विद्यार्थी व विद्यार्थीनींचे रक्तगट तपासण्यात आले.या शिबीराच्या निमित्ताने डाँ.अस्मिता गायकवाड व प्रा.अश्विनी गावडे यांचा सन्मान मा.ढमाले सुरेखा व मा.भालेराव शिल्पा यांचे शुभहस्ते करण्यात आले हे शिबीर सकाळी 11.00 वा.सुरु झाले आणि सांय.5.00 वा.संपन्न झाले.या रक्तगट तपासणी शिबीरात 375 विद्यार्थी सहभागी झाले होते. या शिबीराचे प्रमुख अतिथी व सर्व युनिटचे स्वागत व शिबीराचे उद्घाटन विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री .अकोलकर सर यांनी केले, प्रास्ताविक मा.श्री.गाढवे जे.जी.यांनी,सत्कार नियोजन मा.घोलप डी.डी,.मा.देशमुख व्हि.जी.तसेच मा.बागुल रतिलाल,मा.डुंबरे व्ही.व्ही,मा.भुतांबरे के.डी, मा.पाटील डी.एस्, मा.भाईक बी.एन यांनी तर आभार मा.श्री.काकडे व्ही.एम्. सर व सुत्रसंचालन मा.विठ्ठल शितोळे यांनी केले.