व्येकटेश चालुरकर
तालुका प्रतिनिधी अहेरी
अहेरी : राजाराम केंद्रातील २९ शाळेतील एकूण ७८७ विद्यार्थ्यांना तालुका पत्रकार संघटना अहेरी च्या वतीने शैक्षणिक साहित्य म्हणून नोटबुक, कंपास व पेन वाटप करण्यात आले. दुर्गम भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विध्यार्थी शिक्षणाचा उत्साह निर्माण व्हावी, शैक्षणिक गुणवत्ता वाढ आणि गरजू विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य उपलब्ध व्हावे या हेतूने साहित्य वाटपाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले.राजाराम केंद्रातील छलेवाडा, गुड्डीगुडम, नंदीगाव, गोलाकर्जी,निमलगुडम, रायगठ्ठा, खांदला, चिरेपली, मरनेली,ताठीगुडम,कोडशेलगुडम,भीमारगुडम, सुर्यापली,कोंकापली सह एकूण १९ शाळेतील विद्यार्थ्यांना नोटबुक, कंपास, पेनचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते संतोष ताठीकोंडावार, शाळा समिती अध्यक्ष अरविंद परकिवार, उपाध्यक्ष मनोज सिडाम, केंद्र प्रमुख विनोद पुसलवार, पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष ऋषी सुखदेवें, सचिव रमेश बामनकर,सदस्य उमेश पेंड्याला, सदाशिव माकडे, व्येकटेश चालूरकर, विशाल वाळके, सुरेश मोतकुरवार, मधुकर गोंगले तसेच प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकवृंद,विद्यार्थी उपस्थित होते.