गजानन डाबेराव
ग्रामीण प्रतिनिधी नांदुरा
नांदुरा : नांदुरा तालुक्यातील शेलगाव मुकुंद येथील रहिवासी असलेल्या व सध्या कार्यरत जिल्हा परिषद शाळा रूधाना तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा येथे कार्यरत असलेल्या शिक्षिका कु. जया चव्हाण (सोळंके) यांना यावर्षीचा शिक्षण फाउंडेशन द्वारा संचालित महाराष्ट्र शिक्षण पॅनल एम एस पी राज्यस्तरीय सेवा सन्मान आदर्श शिक्षिका पुरस्कार सोहळा २०२४ दिनांक २४ मे ३०२४ रोजी सकाळी ९ वाजता गुरुदक्षिणा हॉल कॉलेज रोड नाशिक येथे प्रदान करण्यात आला आपण केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल गौरव चिन्ह व सन्मानपत्र सुप्रसिद्ध अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात आले . या कार्यक्रमाला महाराष्ट्र शिक्षण पॅनलचे अध्यक्ष श्री दीपक चामे लातूर आतिश कोळी सचिव संभाजीनगर तसेच प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध अभिनेत्री किशोरी शहाणे श्री अनंत राऊत सुप्रसिद्ध कवी यांची उपस्थिती लाभली होती पुरस्कार प्रदान करताना अनेक मान्यवरांनी आपले विचार मांडले राज्यस्तरीय पुरस्कार देताना महाराष्ट्र शिक्षण पॅनलचे अध्यक्ष श्री दीपक चामे यांनी आपण राष्ट्रनिर्माते आणि विद्यार्थी जीवनाचे भाग्यविधाते आहात शिक्षण क्षेत्रात राष्ट्रनिष्ठा समाजनिष्ठा ज्ञाननिष्ठा व विद्यार्थी निष्ठेपायी आपले अमूल्य योगदान आहे विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यासाठी स्वतःच्या सर्व बलस्थानचा आपण सर्वअर्थाने व सर्वांगाने घेत असलेले परिश्रम तुमच्या कार्याची ओळख जनमानसात निर्माण झालेली आहे. एका आदिवासी पारधी महिला शिक्षकेला राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व आदिवासी पारधी समाज बांधवांकडून अभिनंदनचा वर्षाव होत आहे होत आहे या राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कारसाठी कु. जया चव्हाण ( सोळंके) यांच्यासह सर्व कुटुंबाची उपस्थिती लावली होती.


