शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.
सेलू : सेलू तालुक्या तील देऊळगाव गात येथील गावातील प्रवेश रस्त्याचा गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न आमदार सौ.मेघना दीदी साकोरे यांच्या प्रयत्नामुळे आज मार्गी लागला. गावात येण्या जाण्यासाठी हा प्रमुख रस्ता असून येथे पावसाळ्यामध्ये भरपूर अपघात झाले हे लक्षात घेऊन आज देऊळगाव गात येथे सेलू जिंतूर विधान सभेच्या आमदार सौ. मेघना दीदी साकोरे बोर्डीकर यांच्या प्रयत्नातून 25 15 निधी अंतर्गत सेलू रोड (पिवळा झेंडा चौक)ते धनगर वस्ती पर्यंत सीसी रोड साठी 30 लक्ष रुपयाचा भरिव निधी मंजूर करून दिला आणि आज प्रत्यक्षात कामाला सुरुवातही झाली यावेळी गावातील असंख्य गावकरी उपस्थित होते. उद्घाटन करताना गावाचे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष त्र्यंबक आप्पा कदम,मा. जि. प. सदस्य शिवाजीराव कदम,गोरख मगर दाजी,विसु तात्या कदम,ग्रामपंचायत सदस्य गणेशराव काळे,शिवाजीराव कदम,रामदास हातकडके,विठ्ठल काळे,नितिन कनसे,काशिनाथ हातगडके, मच्छिंद्र काळे,लक्ष्मण काळे, माऊली कदम, दत्ता तांबे,बाबा शिलार,बाळू काका पाचलेगावकर बबनकाका नाईकवाडे,माणिक आबा कदम, रघुनाथ हातकडके, महालीग कवले,अंगद साखरे,रोहिदास गायकवाड आदि उपस्थित होते.