शरद भेंडे
तालुका प्रतिनिधी अकोट
अकोट : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर कुरणखेड जवळ असलेल्या टोल नाक्यावरील अवैध वसुली तात्काळ बंद करावी आणि MH 30 अकोला पासिंग असलेल्या वाहनांना टोल वसुलीत सुट मिळावी या मागणीसाठी वंचीत बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देडवे, महासचिव मिलिंद इंगळे, महिला जिल्हाध्यक्ष प्रभाताई शिरसाट, युवा जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे, अकोला तालुकाध्यक्ष किशोर जामणिक व मुर्तिजापूर तालुकाध्यक्ष सुनील सरदार त्यांच्या नेतृत्वात जन आंदोलन करत रास्ता रोको करण्यात आला. वीस किलोमीटरच्या आत नागरिकांना टोल लागणार नाही या कायद्याची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, अकोला पासिंग असलेल्या गाड्यांना सूट देण्यात यावी, आतापर्यंत वसूल केलेली अवैध वसुली परत करण्यात यावी अशा स्वरूपाच्या मागण्यांचे निवेदन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रकल्प संचालक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा श्रीकांत ढगे यांना निवेदन देण्यात आले तसेच या निवेदनावर तात्काळ कारवाई करावी अन्यथा उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशाराही वंचितच्या यावेळी आंदोलनकर्त्यानी यांनी दिला. या आंदोलनामध्ये वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देडवे, महासचिव मिलिंद इंगळे, महिला जिल्हाध्यक्ष प्रभाताई शिरसाट, युवा जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे, अकोला तालुकाध्यक्ष किशोर जामणिक व मुर्तिजापूर तालुकाध्यक्ष सुनील सरदार, युवा जिल्हा महासचिव राजकुमार दामोदर एड. नरेंद्र बेलसरे, पुष्पाताई इंगळे यांच्यासह जि. प. उपाध्यक्ष सुनील फाटकर, आरोग्य व शिक्षण सभापती मायाताई नाईक, कृषी व पशुसंवर्धन सभापती योगीताताई रोकडे, महिला व बालकल्याण सभापती रिजवाना परवीन, समाजकल्याण सभापती आम्रपाली खंडारे, जि. प. सदस्य निताताई गवई, माजी जि. प. उपाध्यक्ष दामोदर जगताप, आशोक शिरसाट, सुरेश शिरसाट, विकास सदाशिव, सुशील मोहोड, प्रतिभाताई अवचार, राजेश वावकार, वसंतराव नागे, प्रशिक मोरे, सचिन दिवनाले, मोहन तायडे, नितीन सपकाळ, तसवर खान, रवि इंगळे, सुनिल शिराळे,मोहन रोकडे, मनोज तायडे, सनाउल्ला शहा, अनिल शिरसाट, रूपेश हलवाने, शंकरराव राजुस्कर, सम्राट सुरवाडे, इम्रान खान, रवि इंगळे, वैभव यादव, आनंद खंडारे आदर्श खाडे, बाळासाहेब खांडेकर, राजु राऊत पाटील, सतीष उभे आतिक भाई, संतोष किर्तक, प्रविण वाहुरवाघ यांच्या शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.