शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.
एचएआरसी संस्थेचा उपक्रम.
सेलू : संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून परभणी येथील होमिओपॅथीक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज या संस्थेच्यावतीने बालकांचे मोबाईल व्यसन दूर व्हावे व बालकांमध्ये वाचन संस्कृती रुजावी आणि बालकांचा कला विकास मनोरंजक पद्धतीने व्हावा या उद्देशाने सदरील कार्यशाळेचे आयोजन (ता. 24फेब्रु.) शनिवार रोजी करण्यात आले होते.यावेळी व्यासपीठावर मुख्याध्यापक राजू दयावरवार, सह शिक्षक तानाजी राजे भोसले,अमोल श्रीखंडे, श्रीमती शकुंतला बरसाले व कार्यशाळेचे मुख्य प्रवर्तक तथा कला शिक्षक पांडुरंग पाटणकर हे उपस्थित होते. कार्यशाळेचे उद्घाटन राजू दयावरवार यांनी केले. कार्यशाळेत पांडुरंग पाटणकर यांनी सकाळ सत्रात चित्र, शिल्प,नृत्य,नाट्य,
गायन आणि वादन आदि ललित कला विषयी मार्गदर्शन केले .
या बरोबरच कागदकाम, टाळ्यांचे प्रकार, विविध माध्यम प्रिंट, कोलाज चित्र आणि सुतळी काम या विषयी मार्गदर्शन केले.
द्वितीय सत्रात कृतियुक्त गाणं आणि शेकोटी कार्यक्रमात बालकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. आनंदी होऊन शाळेतील मुलांनी कृतीशील सहभाग नोंदविला. यावेळी 90 विध्यार्थी सहभागी होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन तानाजी राजे भोसले यांनी केले तर आभार अमोल श्रीखंडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीते साठी श्रीमती शकुंतला बरसाले श्रीमती सत्यभामा गोरे यांनी सहकार्य केले तसेच सदरील कार्यक्रमासाठी एच ए आर सी संस्थेचे डॉक्टर पवन चांडक आणि प्राध्यापक शिवा आयथॉल यांचे सहकार्य लाभले.