सोपान सासवडे
ग्रामीण प्रतिनिधी अहमदनगर
शेवगाव : तालुक्यातील ढोरजळगाव ने येथील माधुरी घोरपडे यांची एमपीएससी मार्फत कर सहाय्यक अधिकारी म्हणून निवड झाली आहे. मेजर संभाजी घोरपडे यांच्या त्या सुकन्या आहेत. मेजर घोरपडे यांनी देश सेवा करून आता गावात एक प्रगतशील शेतकरी म्हणून तसेच एक यशस्वी पालक म्हणून त्यांची ओळख आहे आपल्या मुलांनी अधिकारी व्हावं ही त्यांची इच्छा होती ती माधुरीने पूर्ण केली. तसेच ढोरजळगाव ने गावातील पहिली महिला अधिकारी होण्याचा मान माधुरीने मिळवला आहे तसेच गावातील मुलींसाठी एक आदर्श निर्माण केला आहे. माधुरीचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण ढोरजळगाव येथे उच्च माध्यमिक शिक्षण जिजामाता कॉलेज भेंडा व बीएससी न्यू आर्ट कॉमर्स अँड सायन्स कॉलेज शेवगाव येथे झाले. एम पी एस सी चा कठोर व नियोजनबद्ध अभ्यास करून त्यांनी नेत्र दीपक यश मिळवले आहे. माधुरीच्या यशाबद्दल जिजामाता कॉलेजचे प्राचार्य डॉ. सासवडे सर, न्यू आर्ट कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. पुरुषोत्तम कुंदे डॉ. वैद्य सर डॉ.संदीप मिरे ,प्रा. कोरडे सर, ढोरजळगांव ने चे सरपंच गणेश कराड, अनंता उकिरडे, भुजंग उकिरडे, छत्रपती उगले, सुखदेव उकिरडे, रविन्द्र डाके, ॲड. सदाशिव आरगडे, ॲड. भाऊसाहेब कराड, पाराजी बुटे विष्णुपंत नवले आदींनी माधुरीचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व भावी कार्यास शुभेच्छा दिल्या.


