सोपान सासवडे
ग्रामीण प्रतिनिधी अहमदनगर
अहमदनगर : हिंदी भाषेची जननी ही संस्कृत भाषा आहे.हिंदी भाषा ही संपूर्ण जगात बोलली जाते. दैनंदिन जिवनात हिंदी भाषेचा विद्यार्थ्यांनी वापर वाढवावा असे प्रतिपादन ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती वत्सला जाधव यांनी केले. शेवगाव तालुक्यातील चापडगाव माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये मोठ्या उत्साहामध्ये आज शुक्रवार दि.15 हा दिवस हिंदी भाषा दिवस’ म्हणून साजरा करण्यात आला. याप्रसंगी त्या अध्यक्षस्थानाहून बोलत होत्या. कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर प्राचार्य अरुण वावरे,पर्यवेक्षक लक्ष्मण गाडे, हिंदी विषय शिक्षक अक्षय पुरनाळे, सर्जेराव निकाळजे, किरण गोरे, अनिल जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. शिक्षक प्रतिनिधी म्हणून प्रा. श्री. किरण गोरे यांनी हिंदी यह माथे की बिंदिया है, हिंदी भाषा सबसे ज्यादा बोलचाल की भाषा है, हिंदी 120 देशों में बोली जाने वाली भाषा है, स्वामी विवेकानंद जिने हिंदी भाषा मे शिकागो मे हिंदू धर्म का महत्व बताया. त्याचबरोबर हिंदी भाषेचे महत्व ,हिंदी भाषाची आवश्यकता, हिंदी राजभाषा मान्यता या संदर्भात सखोल अशी माहिती विद्यार्थ्यांना दिली. विद्यालयाचे प्राचार्य श्री. अरुण वावरे म्हणाले की हिंदी यह महान लोगो की भाषा है, हिंदी भाषेची आवश्यकता, हिंदी भाषेचे महत्व ,त्याचबरोबर हिंदी भाषेचा इतिहास विद्यार्थ्यांना समजावून सांगितला. हिंदी भाषा प्रगल्भ करण्यामध्ये प्रेमचंद मुंशी, महादेवीजी वर्मा ,हरिवंशराय बच्चन यांची भूमिका महत्त्वाची आहे असेही ते पुढे म्हणाले. या हिंदी भाषा दिनाबद्दल काही विद्यार्थ्यांनी स्फूर्तीने आपले विचार मांडले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्राध्यापक श्री. दादासाहेब ज्योतीक यांनी तर आभार श्री. सर्जेराव निकाळजे यांनी मांनले.


