सोपान सासवडे, ग्रामीण प्रतिनिधी
अहमदनगर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची 394 वी जयंती चापडगाव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मोठ्या दिमाखात साजरी करण्यात आली. प्रसंगी चापडगाव मधून विद्यालयाची मोठी मिरवणूक काढण्यात आली. प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य अरुण वावरे, उपप्राचार्य भाऊसाहेब टाकळकर, पर्यवेक्षक लक्ष्मण गाडे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद, विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यक्रम प्रसंगी शिवव्याख्याते दीपक करपे यांच व्याख्यान आयोजित करण्यात आली होते. त्यांनी विद्यार्थी व ग्रामस्थ यांना आपल्या व्याख्यानातून मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आरतीने झाली. प्रतिनिधिक स्वरूपात कुमारी श्रद्धा मडके हिचे भाषण झाले.विद्यालयाच्या फेरीचे ग्रामस्थांनी चौकाचौकात स्वागत करून अभिनंदनाचा वर्षाव केला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वृंदांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक दादासाहेब ज्योतीक यांनी केले तर आभार अक्षय पुरनाळे यांनी मानले.