बालमटाकळीत अविनाश पाटील लोढे यांचा नागरी सत्कार….!
राज्यसेवा परीक्षेत महाराष्ट्रात २५ व्या क्रमांकाचे उत्तीर्ण होऊन क्लासवन पदी निवड….!
प्रशांत बाफना
शहर प्रतिनिधी अहमदनगर
अहमदनगर:शेवगांव तालुक्यातील मजलेशहर येथील प्रगतशिल शेतकरी व माजी सरपंच विक्रम पाटील लोढे यांचा मुलगा अविनाश लोढे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेत महाराष्ट्रामधे २५ व्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन क्लासवन पदी निवड झाल्याबद्दल बालमटाकळी येथे संवाद्य मिरवणूक काढून त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागातील बालमटाकळी येथील ग्रामदैवत बालंबिका देवी मंदिरात अविनाश पाटील लोढे हे राज्यसेवा परीक्षेत उत्तीर्ण होऊन क्लासवन अधिकारी झाल्यामुळे नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.
शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रामनाथ राजपुरे यांचे शेवगांव तालुक्यातील मजलेशहरचे प्रगतशील शेतकरी व माजी सरंपच विक्रम पाटील लोढे हे मेहुणे असुन अविनाश पाटील लोढे हे सत्काराला उत्तर देताना म्हणाले की, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेत महाराष्ट्र मध्ये २५ व्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन क्लासवन अधिकारी पदी निवड झाल्यामुळे आजचा सन्मान हा मामाच्या गावामध्ये झाल्यामुळे हा सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यासारखा दिवस आहे. जिद्दीने आणि हिमतीने ही लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालो, या यशामागे माझ्या आई-वडिलांचे व नातेवाईकांचे, मामांचे आशीर्वाद, प्रेम व साथ मला मिळाल्याने मी आज क्लासवन अधिकारी म्हणून माझी निवड झाली आहे या पदाचा मी दिन दुबळ्यांची सेवा करून मी माझी वाटचाल चांगल्या पद्धतीने करीत राहील अशा प्रकारे सत्काराला उत्तर देताना अविनाश पाटील लोढे म्हणाले. यावेळी ह .भ.प. साध्वी शितल देशमुख, ह.भ.प. राहुल गरड, रामेश्वर महाराज देशमुख, विक्रम लोढे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रामनाथ राजपुरे, सरपंच डॉ. राम बामदळे, शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती एकनाथ कसाळ , ज्ञानेश्वरचे माजी संचालक मोहनराव देशमुख , रोहन राजपुरे , सेवा संस्थेचे चेअरमन माणिकराव शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य नितीनराव काकडे, कमुभाई शेख, ज्ञानेश्वरचे माजी संचालक चंद्रकांत गरड, सेवा संस्थेचे माजी उपाअध्यक्ष रतनराव देशमुख, विठ्ठल देशमुख ,भानुदास गलधर, पत्रकार जयप्रकाश बागडे पञकार प्रशांत बाफना , बाबासाहेब भाकरे , सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष हरीशचंद्र घाडगे, शेवगाव कुस्ती तालीम संघाचे अध्यक्ष विक्रम बारवकर, मधुकर पाटेकर, अशोक खिळे, प्रशांत देशमुख, संदिप देशमुख, हरीशचंद्र राजपुरे, बाबासाहेब देशमुख, अशोक वैद्य, भारत घोरपडे, गणेश शिंदे, भाऊसाहेब बामदळे, रोहीदास भोंगळे, रोशन बागडे, श्रीकांत राजपुरे, दिगांबर टोके, राम तांबे, बाबा गरड, योगेश दोडके, संदिप शिंदे, राजुदादा राजपुरे, संभाजी तिडके, राजेंद्र ढमढेरे पाटील, परमेश्वर शिंदे, बबनराव लोणकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.