प्रशांत बाफना
शहर प्रतिनिधी अहमदनगर
अहमदनगर:पाथर्डी तालुक्यातील दुर्गम डोंगराळ भागातील मोहरी गावचे सुपुत्र बबनराव डोईफोडे. त्यांच्या वडिलांचा मेंढपाळ चा व्यवसाय होता. बबनराव हे शालेय जीवनापासूनच मेंढपाळ करत होते व शिक्षण घेत होते. बुद्धीच्या जोरावर त्यांनी कृषी सहाय्यक, पर्यवेक्षक ही पदे मिळवली. पाथर्डी तसेच नगर तालुक्यात नोकरी करत असताना शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचवण्याचे त्यांनी कार्य केलं. 1990 च्या दशकात भौतिक सुख सुविधा चा अभाव होता त्यावेळी वैद्यकीय सेवेसाठी अहमदनगर शिवाय पर्याय नव्हता त्याकाळी पाथर्डी ,शेवगाव, नेवासा तालुक्यातील समाज बांधवांना वैद्यकीय सेवेसाठी नगरला यावेच लागे.त्यावेळी समाज बांधव व नातेवाईकांना मदतीचा आधारवड म्हणजे डोईफोडे साहेब व त्यांची पत्नी सुभद्राबाई. पेशंट व नातेवाईक यांना राहण्याची व जेवणाची तसेच वेळोवेळी दवाखान्याचे बिल भरण्यासाठी पैशाची भरभरून मदत सढळ हाताने करत. समाज बांधव व नातेवाईक यांच्या सुखदुःखात डोईफोडे साहेब रात्री अपरात्री तत्परतेने उभे राहत व त्यांना भरभरून मदत करत. दुर्गम अशा खेडेगावातून शहरात येऊन चिकाटी व कष्टाच्या जोरावर त्यांनी डोईफोडे कॉम्प्लेक्स उभारणा केली. तरुण वर्गाला ते नेहमी उपदेश करत, प्रामाणिकपणे कष्ट करत रहा यश नक्की मिळेल ,थांबला तो संपला असे ते नेहमी सांगत. अशा या महान आत्म्याला समाज बांधव व नातेवाईकांकडून भावपूर्ण श्रद्धांजली. अल्पशा आजाराने त्यांना दिनांक 2 शुक्रवारी सकाळी सात वाजून पंचवीस मिनिटांनी त्यांना देवाज्ञा झाली त्यांचा दशक्रिया विधी रविवार दिनांक 11 सकाळी आठ वाजता अहमदनगर अमरधाम येथे होणार आहे. त्यांच्या पाठीमागे पत्नी सुभद्राबाई मुलगा राकेश ,उमेश ,मुलगी रेखा व नातवंडे असा परिवार आहे