अमोल टेकले
तालुका प्रतिनीधी मुदखेड
मुदखेड : श्री शितलादेवी सेवाभावी प्रतिष्ठान बारड संचलित शंकरराव देशमुख इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, बारड येथे दर वर्षी प्रमाणे याही वर्षी 10 वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा सौ. छायाबाई संजयराव देशमुख ह्या उपस्थित होत्या. तसेच इतर उपस्थित मान्यवारांमध्ये संस्थेचे उपाध्यक्ष श्री. मारोती कांबळे साहेब, सचिव श्री. संजय देशमुख बारडकर, व इतर सदस्य उपस्थित होते. तसेच स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ बारड चे उपाध्यक्ष श्री. रमेशचंद्र आदिनाथ महाजन साहेब व त्यांचे कार्यकारी मंडळ आणि गावातील इतर प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात ही संस्थेच्या अध्यक्षा व इतर सदस्यांच्या हस्ते माता सरस्वतीच्या मूर्ती च्या पूजनाने झाली. त्यानंतर संस्थेच्या अध्यक्षा व इतर सर्व सभासदांचे शाळेच्या प्रचार्यांच्या वतीने सुमानांनी स्वागत करण्यात आले. तसेच लगेच संस्थेच्या वतीने इयत्ता दहावी च्या विद्यार्थ्यांचे आणि शाळेतील सर्व शिक्षकांचे देखील सुमानांनी स्वागत करण्यात आले. तसेच यानंतर जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा बारड चे कर्तव्यदक्ष शिक्षक श्री. दिगंबर शंकरराव कदम सर यांचा, त्यांच्या सेवानिवृती निमित्त संस्थेचे सचिव व इतर सदस्यांतर्फे शाल, श्रीफळ व सुंदर अशी विठ्ठलाची मूर्ती, भेट म्हणून देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली. सर्वप्रथम इयत्ता नववी व सहावी तील काही विद्यार्थ्यांनी दहावी च्या विद्यार्थ्यांना निरोप देताना आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर इयत्ता दहावी च्या विद्यार्थ्यांनी देखील आपला शालेय जीवनातील प्रवास उलगडताना आपल्या भावना व्यक्त केल्या. यामध्ये शाळेचा ‘हेड बॉय’ या नात्याने रोहन विठ्ठलराव सोळंके, तसेच सेजल संतोष येमले, वेदिका पाटील, प्रिया पवार यांसारख्या विद्यार्थ्यांनी शाळेप्रति आपले प्रेम आणि ऋण व्यक्त केले. यानंतर संस्थेचे सचिव, श्री. संजय देशमुख बारडकर यांनी दहावी च्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शैक्षणिक प्रवासासाठी मोलाचे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन फक्त मोठे नोकरदार किंवा व्यावसायिक होण्याबरोबरच एक माणूस म्हणून समाजात कसा नावलौकिक मिळवावा याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी काय करावे आणि काय करू नये, जसे की मोबाईल चा अति वापर टाळणे, कोणत्याही गोष्टीचा अपव्यय टाळणे, जसे पाणी, वीज, निसर्गाचे रक्षण करणे इत्यादी बाबतीतही मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिव्या देशमुख रुत्वा कवळे या विद्यार्थिनींनी केले शेवटी शाळेचे शिक्षक श्री. नाविद खान सर यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रम समाप्त झाला असे घोषित केले.


