प्रशांत बाफना
शहर प्रतिनिधी अहमदनगर
अहमदनगर :बालमटाकळी गावचे रहिवासी असणारे योगेश पोकळे यांनी समाजासमोर एक आदर्श उदाहरण निर्माण केले. विवाह प्रसंगी होणाऱ्या अनेक अनावश्यक खर्चाला बगल देऊन त्यांनी ज्ञानाच्या मंदिरासाठी उत्तम असे कार्य केले. आपल्या लग्नातील प्री-वेडिंग व्हिडिओ चा खर्च टाळून त्यांनी परिसरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लाडजळगाव, भगवान नगर व चेडे चांदगाव या शाळेला प्रत्येकी तीन हजार शंभर रुपये आपल्या विवाहप्रसंगी दिले. तसेच ज्या शाळेत मुळाक्षरे गिरवून खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाला आकार मिळाला अशी जिल्हा परिषद आदर्श शाळा बालमटाकळी साठी एक बोअर घेऊन देण्यासाठी रक्कम दिली. विवाह प्रसंगी शाळेतील ज्येष्ठ शिक्षक पोटभरे सर, दौंड सर, गरकळ सर, देवढे सर , बैरागी सर, गाडेकर सर आदी उपस्थित होते. पोकळे परिवाराच्या वतीने गावचे सरपंच आदरणीय डॉ. राम बामदळे, नंदू पोकळे, छगन पोकळे, संतोष औटी, बाबासाहेब पोकळे, संभाजी पोकळे , अशोक पोकळे यांचे हस्ते सर्व शाळेला देणगी देण्यात आली. विवाह प्रसंगी गावातील व परिसरातील सर्व श्रेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या या कार्याबद्दल तालुक्याच्या गट शिक्षण अधिकारी आदरणीय तृप्ती कोलते मॅडम,बोधेगाव बीट चे विस्तार अधिकारी आदरणीय डॉ.गाडेकर साहेब, केंद्र प्रमुख भांगरे साहेब, शाळेच्या मुख्याध्यापिका कवडे मॅडम, हिवाळे मॅडम, बैरागी मॅडम, कांबळे मॅडम,व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष महेश पवार व सदस्य गोरक्षनाथ शिंदे, बाबा सोनवणे, तोटेवाड सर यांनी पोकळे परिवाराचे आभार व्यक्त केले.