योगेश राठोड
ग्रामीण प्रतिनिधी यवतमाळ
अकोला बाजार : दिनांक 15 फेब्रुवारी रोजी संत शिरोमणी, बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराज यांची जयंती अकोला बाजार येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
14 फेब्रुवारी रोजी येथील पांपट्टीवार मैदानात गोर बंजारा उत्सव समिती अकोला बाजार सर्कल मध्देआयोजित सायंकाळी अकोला बाजार व परिसरातील सर्व बंजारा समाजासह इतरसमाज बांधव एकत्र आले.
सामान्य ज्ञान परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यात आले. या बक्षीस वितरण प्रासंगिक सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमा करिता अध्यक्ष म्हणुन वडगाव जंगल पोलिस स्टेशनचे एएसआय भाऊराव बोकडे तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्राम पंचायत उपसरपंच प्रविण मोगरे सचिन कोयरे, प्रविण राठोड हे मंचावर उपस्थित होते. अध्यक्ष आणि प्रमुख पाहुण्याच्या हस्ते सामान्य ज्ञान परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थांना सन्मान पत्र दिले.
बक्षिस वितरण होता क्षणी बंजारा समाज बांधवांचा पारंपरिक लेंगी नृत्य महोत्सवला सुरुवात केली. दिनांक 15 फेब्रुवारी रोजी सेवालाल महाराज पारंपरिक पद्धतीने पूजा अर्चा करत गावातून व परिसरातील वेगवेगळ्या गावातून बाईक रॅली काढूनयमहाप्रसादाने संत सेवालाल महाराज यांची जयंतीची सांगता करण्यात आली.
या कार्यक्रमाला युवा तरुन मुलानि मोलाचे योगदान देत त्याच्या साथीला रोशन जाधव,ज्ञानेश्वर जाधव, सूरज राठोड,चेतन पवार, कुलदीप राठोड,हेमंत राठोड, अरविंद राठोड विकास जाधव विनोद चव्हान विशनु राठोड चंदु पवार पुरुषोत्तम आडे,ओमप्रकाश आडे, करण जाधव, योगेश राठोड, अरविंद जाधव या सर्व सर्कल मधील तरुन मुलांना व आदींनी मोठी मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला.