मारोती बारसागडे तालुका प्रतिनिधी चामोर्शी
चामोर्शी= तालुक्यांतील मौजा कर्कापली येथे उपवनसंरक्षक वन विभाग आलापल्ली वनपरिक्षेत्र कार्यालय चामोर्शी व संयुक्त वन व्यवस्थापन समिती कर्कापली यांच्या संयुक्त विद्यमाने त्रिनेस्त्र पदम कृषी व ग्रामीण बहुसंस्था भंडाराच्या वतीने लाख लागवड व प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मौजा कर्कापली येथे लाख लागवड प्रशिक्षण देऊन गावातील नागरिकांना शेतामधील असलेल्या झाडांपासून उत्पन्न घेता यावा व त्यांच्या हाताला रोजगार मिळावा या उद्देशाने लाख लागवडीकरिता उपयोगी वस्तूंचे वितरण करून प्रशिक्षण देण्यात आले..या कार्यक्रमा प्रसंगी उपस्थित वनपरिक्षेत्र अधिकारी इनवाते साहेब चामोर्शी, मा. क्षेत्र सहाय्यक चांदेकर साहेब भाडभिडी ,गजबे साहेब (प्रशिक्षक) ,बान्नोत साहेब वनरक्षक कर्कापल्ली, लांजेवार साहेब वनरक्षक आमगाव ,वैरागडे साहेब वनरक्षक मारोडा ,विनोद धोडरे (मदतगार) , मारोडा ग्रामपंचायतचे सरपंच अनिल जुरे, ग्रा.पं. सदस्य रोशन कोहळे, पेसा मोबिलायझर्स सुमित्रा जूरे व इतर समस्त गावकरी मंडळी उपस्थित होते.











