प्रकाश कांबरे
तालुका प्रतिनिधी हातकणंगले
नागांव ता. हातकणंगले येथेजलजीवन मिशन योजनेअंतर्गत नागाव गावच्या पुढील २५ वर्षाचा विचार करून माजी आमदार अमल महाडिक व माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शोमिका महाडिक यांनी तत्कालीन सरपंच अरुण माळी यांच्या कारकिर्दीत पाणी योजना मंजूर करून आणली सुरुवातीला या योजनेतून जल – शुद्धीकरण केंद्र उभारणे तसेच आपटेमाळ आंबेडकर नगर, संभाजीनगर या ठिकाणी पाण्याची टाकी उभारणे या बाबींचा समावेश होता.तसेच संपूर्ण गावातून अंतर्गत वितरणासाठी पाईपलाईन टाकणे नागावच्या सीमारेषेवर असणाऱ्या मौजे वडगाव हद्दीतील पाझर तलावातून पाणी घेण्याचे नियोजन केले होते.पण या तलावातून पाणी घेण्यास मौजे वडगाव ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला. व पाण्याचा एक थेंबही देणार नाही अशी भूमिका मांडली त्यामुळे येथून पाणी घेण्याची योजना बारगळली.यानंतर नागाव ग्रामपंचायत हालोंडी येथून पंचगंगा नदीतून पाणी आणण्याचे नियोजन करून तसा ठराव करून मंत्रालयात मंजुरी साठी पाठविला आहे. ही बाब निदर्शनास आल्यानंतर नागरिकांच्यातून हालोंडी येथून पाणी घेण्यास विरोध होत आहे.सध्या पंचगंगेचे पाणी पिण्या- योग्य नाही.पंचगंगेची गटारगंगा झाली आहे.कोल्हापूर शहराचे ड्रेनेजचे पाणी जयंती नाल्यातून थेट पंचगंगेत मिसळत आहे.त्याचबरोबर शिरोली औद्योगिक वसाहतीचे रसायनमिश्रित पाणी पंचगंगेत मिसळत आहे.पंचगंगा नदीकाठची गावे सुध्दा हे पाणी प्यायला तयार नाहीत. नदी उषाशी असताना कोल्हापूर महानगरपालिकेने ६० किमी लांब काळम्मावाडी तून पाणी आणले आहे.इचलकरंजी शहर सुद्धा पंचगंगा नदीवर वसले असताना त्यांचा कित्येक वर्षे झाली वारणा किंवा दुधगंगा नदीतून पाणी आणण्यासाठी संघर्ष सुरू आहे. नागाव ग्रामपंचायतीच्या म्हणण्या- नुसार आम्ही फिल्टर हाऊस बांधणार आहोत,पण या फिल्टर हाउस ची शाश्वती कोण घेणार? पाणी पूर्ण शुद्ध पाणी मिळेल याची खात्री काय?कोल्हापूर किंवा इचलकरंजी इतकी मोठी महानगरे असताना त्यांना फिल्टर हाऊस बांधून पंचगंगेतून पाणी घेता आले असते.पण त्यांना वास्तव माहीत आहे,त्यामुळे कोल्हापूर शहराने थेट काळम्मावाडीतून पाणी आणले,इचलकरंजी शहराचा जो एवढा मोठा संघर्ष चालू आहे,तो सुद्धा पंचगंगेचे पाणी नको म्हणून. या सर्व बाबी नागाव ग्रामपंचायतीला माहीत असून सुद्धा दूषित पाणी आणून हजारो नागरिकांच्या आरोग्याशी जीवाशी का खेळत आहे ? हे समजत नाही.हे दुर्गंधीयुक्त व रसायनमिश्रित पाण्यामुळे पुढील अनेक पिढ्या वेगवेगळ्या आजाराने ग्रस्त होणार आहेत.त्यामुळे नागरिकांच्या व गावाचे हित लक्षात घेऊन लोकांच्या जीवावर बेतणारे हे पंचगंगेचे हे काळे पाणी न आणता इतर पर्यायांचा विचार ग्रामपंचायतीने करावा,अशी मागणी लोकांच्यातून होत आहे.गावातील सर्व गटांनी यामध्ये कोणतेही राजकारण न आणता एकत्र बसून योग्य त्या पर्यायाचा विचार करावा,अशा भावना नागरिक व्यक्त केल्या.नागरिकांच्या या रास्त मागणीचा विचार करून विकास आघाडी नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे असे विकास आघाडी ने आयोजित केलेल्या बैठकीत सांगण्यात आले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते दयासागर कांबळे म्हणाले की कोणत्याही नामांकित कंपनीचा फिल्टर आणून गावामध्ये त्याचे प्रात्यक्षिक दाखवणार आहे.फिल्टर क्षार,बॅक्टेरिया हे घटक कमी करतात,केमिकल वेगळे करू शकत नाहीत. त्यामुळे हे रसायन मिश्रित पाणी नको,विमल शिंदे,सरपंच नागाव म्हणाल्या की पाण्यासाठी कोणतेही राजकारण न आणता सर्वाना एकत्र घेऊन अन्य चांगला पर्याय असेल तर त्याचा जरूर विचार करू व त्यासाठी पाठपुरावा करू.
तर किरण मिठारी म्हणाले की
सत्ताधारी मंडळींनी नागरिकांच्या या मागणीचा गांभीर्यपूर्वक विचार करावा अन्यथा पाण्यासाठी आम्ही जन- आंदोलन उभे करू.येत्या दोन दिवसात तसे रितसर निवेदन आम्ही संबधीत विभागास देणार आहोत.