सोनेराव गायकवाड
जिल्हा प्रतिनिधी लातूर
लातूर : लातुर तालुक्यातील भोयरा येथील संजय बबनराव भोसले यांच्या घरी, नवनाथ ग्रंथ समाप्ती निमित्ताने लातूर जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार सुधाकर शृंगारे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी बबनराव हरिभाऊ भोसले यांनी खासदार सुधाकर शृंगारे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. भोयरा गावातील शिंदे वस्ती भागातील ट्रान्सफार्मर ( डेपो ) वरील वीज वारंवार जात असून शेतकऱ्यांचे हाल होत आहेत,या भागातील लाईनमन, इंजिनिअर यांना वारंवार सांगून देखील, दखल घेतली जात नाही.असे शेतकऱ्यांनी खासदार सुधाकर शृंगारे यांना सांगितले.शिंदे वस्ती भागातील ट्रान्सफार्म ( डेपो ) तात्काळ दुरुस्ती करून या भागातील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सुरळीत करण्या यावा असे खासदार सुधाकर शृंगारे यांनी एम.एस.ई.बी मधील वरिष्ठ अभियंत्याला फोन करून सांगितले आहे.यावेळी उपस्थित संजय सोनकांबळे, अंगद भोसले, गंगाधर साळुंके, बाबा साळुंके, रामराव लकडे, भरत माने, रामहरी सुरवसे, विष्णू लकडे, नागनाथ सरवदे, सुखदेव बरडे, हिरालाल लकडे, कल्याण जाधव, राजाभाऊ घुले, बबन सुरवसे, हनुमंत सुरवसे, गुणवंत माने, बालाजी बंडगर, शालीक पवार, नाना कांबळे ई ग्रामस्थ उपस्थित होते.