सोनेराव गायकवाड
जिल्हा प्रतिनिधी, लातूर
लातूर : लातूर तालुक्यातील गंगापूर येथील जय किसान उच्च माध्यमिक विद्यालयाचा बारावीचा निकाल ९७.६१% लागला आहे.या वर्षी परीक्षेसाठी एकूण ४२ विद्यार्थी बसले होते,त्या पैकी ४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून एकाची अनुपस्थि होती. जय किसान उच्च माध्यमिक विद्यालयात (१)कु.राजश्री संजय राऊत (८५.००%) व कु.वैष्णवी लक्ष्मण सुर्यवंशी (८५.००%) घेऊन प्रथम आली आहे. (२)द्वितीय:- शेख महेक लायक (८२.५०%),(३) चैत्राली राजकुमार शिंदे (८१.८३%) टक्के घेऊन तृतीय आली आहे.या सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे गंगादेवी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बलभीम देविदास शिंदे,उपाध्यक्ष राधाकृष्ण गाडेकर,सचिव डॉ. सतीश कानडे, सह सचिव आनंद माने,कोषाध्यक्ष बळीराम गाडेकर तसेच जय किसान उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य ए.व्ही बिरादार,पर्यवेक्षक टी.बी कोळी, प्राध्यापक बी.व्ही लकशेटे,पी.यु ढोबळे, पत्रकार संजय राऊत व सर्व शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी यांच्या वतीने स्वागत करण्यात आले आहे.