सोनेराव गायकवाड
जिल्हा प्रतिनिधी, लातूर
लातूर:- नांदेड जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यभार पाहिलेल्या सौ.वर्षा ठाकूर-घुगे (I.A.S -2011) यांनी लातूर जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्या महिला जिल्हाधिकारी म्हणून दि.२२/०७/२०२३ रोजी पदभार स्वीकारून बहुमान मिळविलेला आहे. तसेच गोंदियाचे सहाय्यक जिल्हाधिकारी अनमोल सागर (I.A.S -२०१९) यांची लातूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.नूतन जिल्हाधिकारी सौ.वर्षा ठाकूर-घुगे :-लातूर हे एक ऐतिहासिक, सांस्कृतिकरीत्या एक नावाजलेलं असं हे शहर, जिल्हा आहे.कोटा ऑफ द महाराष्ट्र शैक्षणिक यांच्यात सुध्दा खूप ऊंची आहे,अशा शहराच्या, जिल्ह्याची जिल्हाधिकारी पदी संधी मिळाली,शासनाने माझी नियुक्ती केली आहे त्याबद्दल मी शासनाची आभारी आहे.प्रशासन भिमुख असं काम करायचं आहे, सकारात्मक जनसामान्य हा केंद्र बिंदू ठेऊन त्याच पद्धतीने काम करण्यात येईल,त्याच प्रमाणे नाविन्यपूर्ण कांही उपक्रम करण्याकडे कल असेल.महिला सक्षमीकरण बचत गट तळागाळातील महिलांसाठी भरीव कार्य कसं करता येईल त्या कडे लक्ष्य राहील.आमचं प्रशासन हे आव्हानात्मक असेल,करारात्मक असेल पण त्याच बरोबर त्याला संवेदनशील तेची जोड असेल.असंही नूतन जिल्हाधिकारी सौ.वर्षा ठाकूर-घुगे म्हणाल्या आहेत.