सामाजिक कार्यकर्ते महादेव गायकवाड यांच्या हस्ते केले ध्वजारोहण.
सोनेराव गायकवाड
जिल्हा प्रतिनिधी,लातूर
लातूर:- मराठी साहित्यात उपेक्षितांच्या अंतरंगाचा वेध घेणारे,..तसेच अवघ्या दीड दिवसाचे शिक्षण घेऊन साहित्याचा मान मिळविणारे थोर समाजसुधारक लेखक, कवी, साहित्यरत्न, लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांची 102 वी जयंती. लातुर तालुक्यातील गंगापूर गावामध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
सामाजिक कार्यकर्ते असलेले महादेव गायकवाड व जेष्ट नागरिक,महिला यांच्या शुभ हस्ते,.. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे,व क्रांतिवीर वस्ताद लहुजी साळवे यांच्या प्रतिमेचे पूजन करून,..सामाजिक कार्यकर्ते महादेव गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले आहे.
या वेळी सामाजिक कार्यकर्ते तथा पोलीस हेडकोन्स्टेबल बलभीम गायकवाड, लातूर ग्रामीणचे हेडकोन्स्टेबल बाबू येणकुरे, अभंग गायकवाड, प्रदीप गायकवाड, सतीश गायकवाड, प्रशांत शिंदे, संदीप रणदिवे, विकास गायकवाड, लालासाहेब गायकवाड, बालाजी गायकवाड, तुकाराम गायकवाड, संजय शेलार, भाऊसाहेब शेलार, नागनाथ गायकवाड, वसंत गायकवाड, सदाशिव गायकवाड ईत्यादी ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.