सोनेराव गायकवाड
जिल्हा प्रतिनिधी, लातूर
लातूर – दि. अटल भूजल योजनेची सर्वधर्मसमभाव कलापथकाद्वारे जनजागृती मोठ्या उत्साहात करण्यात आली. अटल भूजल योजने बाबत माहिती व प्रसारण मंत्रालयांच्या केंद्रीय संचार ब्युरो ऑफ आऊटरिच अँड कम्युनिकेशन तसेच भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा लातूर यांच्या आदेशान्वये सर्वधर्मसमभाव कला मंडळ खंडाळा ता. जि. लातूर यांच्या मार्फत धनेगाव, गाधवड, रामेगाव, दर्जी बोरगाव व निवाडा या गावांमध्ये पाणी जिरवा-पाणी आडवा, भूजल बचतीचे महत्त्व, पाण्याचे महत्व, विहीर पुनर्भरण, ठिबक- तुषार सिंचन, फळबाग लागवड, पाणलोटाचे विविध उपचार पद्धती, भूजल पातळीमध्ये होत असलेली घसरण दरामध्ये सुधारणा करणे, जलसुरक्षा आराखड्यातील विविध विभागांच्या योजनेचा अभिसरणातून होणारी जलसंधारणाची विविध कामे व जल सुरक्षा आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी या विषयावर विविध गीत, पोवाडे यातून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली. भविष्यकाळात पाणीटंचाईचे संकट टंचाईग्रस्त गावांमध्ये येऊ नये यासाठी अटल भूजल योजना मोठ्या प्रमाणात काम करत असून सर्वधर्मसमभाव कलापथकातील सहभागी कलावंत अशोक शिंदे, सुशीला श्रीराम रणदिवे, राहुल खुडे, उत्तम साबळे, इत्यादी कलावंतानी हे अभियान यशस्वी केले. या अभियानामुळे लोकांना पाण्याचे महत्व कळले असून गावातील सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील, ग्रामस्थ तसेच कार्यक्रमासाठी बचत गटातील सदस्य, शाळेतील विद्यार्थी, यांचा चांगला प्रतिसाद मिळत असून वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा लातूरचे एस. बी. गायकवाड यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक कक्षाचे एच. आर. नाईक, एच. पी. पठारे, पी.एम. गोरपल्ले, आर. एन. पठाण, शुभम शिंदे, जिल्हा भागीदार संस्थेचे समाज संघटक, माहिती शिक्षण संवाद तज्ञ यांचे मोठे सहकार्य लाभले.