लाखो भाविकांनी घेतले भद्रनाग स्वामींचे दर्शन
दोन वर्षांनंतर पुन्हा भरली यात्रा
महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधी भद्रावती
भद्रावती,दि.२:-कोरोना प्रादुर्भावाच्या दोन वर्षांनंतर या वर्षी प्रथमच शहरातील सुप्रसिद्ध तथा ऐतिहासीक नागपंचमीला यात्रेला मोठ्या उत्साहात सुरवात होऊन नागपंचमीच्या दिवशी लाखो भाविकांनी श्री. भद्रनाग स्वामींचे दर्शन घेतले.श्री भद्रानाग स्वामींच्या अभिषेक पूजेनंतर मंदिर दर्शनासाठी भविकांकरिता खुले करण्यात आले.अगदी पहाटे पासुन मंदिरात भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.सदर या यात्रेत येणाऱ्या भाविकांना असुविधा होऊ नये यासाठी गांधी चौक ते भद्रनाग मंदिरापर्यंत मुख्य रस्ता आम वाहूतुकीसाठी बंद करून या रस्त्यावरील वाहतूक अन्य रस्त्याने वळविण्यात आली होती. दोन वर्षाच्या कलावधीनंतर प्रथमच ही यात्रा भरीत असल्याने भद्रावती शहरातभाविकांनी प्रचंड गर्दी केली.मंदिर प्रशासनातर्फे या नागपंचगमी यात्रे निमित्ये मंदिराला आकर्षकरीत्या सजविण्यात आले.त्याच प्रमाणे मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच मंदिरात परिसरात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्तही करण्यात ठेवण्यात आला. अग्निशमन दलाचे गाडीही परिसरात तैनात करण्यात आली. ही नागपंचगमी यात्रा यशस्वी करण्यासाठी भद्रनाग स्वामी देवस्थान अध्यक्ष डॉ. रमेश मिलमिले, उपाध्यक्ष योगेश पांडे व पदाधिकारी, पोलीस प्रशासन, नगर पालिका प्रशासन, शिंदे महाविद्यालय तथा मंदिर प्रशासना तर्फे योग्य ती व्यवस्था व भाविकांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.