अविनाश गायकवाड
ग्रामीण प्रतिनिधी तरोडा (क)
तरोडा (क) : शेतकऱ्यांचा मित्र म्हतल्या जाणाऱ्या नांगदेवतांच्या पालखीची मिरवणूक तरोडा (क). या गावात अतिशय आनंदात काढण्यात आली.तसेच गावातील सर्व देवतांच्या मंदिरात जावून त्यांची आरती करण्यात आली त्याचप्रमाणे गावातील भजनी मंडळींनी अतिशय उत्तम असे भजन म्हणून या कार्यक्रमाची शोभा वाढवली. तसेच गावातील स्त्रियांनी नंगदेवतांच्या पालखीचे पूजन केले. पालखी सोहळ्यात तरुण मंडळी तरुण मंडळी अतिशय जास्त प्रमाणात हजर होती,त्यामुळे कार्यक्रमाला आणखी शोभा आली. दरवर्षी नांगपंचमी निमित्त गावातील महादेव मंदिरात ठाव्याचे आयोजन केले जाते. यावर्षीसुद्धा ५ दिवस ठाव्याचे आयोजन केले आहे.