अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
पातूर:- शहरातील तथा ग्रामीण भागातील जनतेला पुरेशा आयुर्वेदिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात या हेतूने मातोश्री श्रीमती मैनाबाई दिगंबर बोंबटकार यांच्या स्मृती प्रित्यर्थ श्री दत्त क्लिनिक व आयुर्वेदीक पंचकर्म केंद्र, गुरुवार पेठ, पातूर यांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्या श्रावणी सोमवारी पातूर येथे मोफत आरोग्य तपासणी व रोग निदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. आयोजित शिबिरामध्ये आयुर्वेदाचार्य डॉ साचितानंद बोंबटकार व डॉ पल्लवी साचितानंद बोबटकार यांच्यामार्फत मानवी रोग विकार व योग्य चिकित्सापर मार्गदर्शन करण्यात आले. तसेंच या रोग निदान शिबिरात शेकडो रुग्णांच्या हाडाचे व मणक्याचे आजार,त्वचा विकार, केस विकार,पोटाचे विकार,स्त्री विकार, गुद विकार अशा विविध तपासण्या करण्यात आल्या व रुग्णांना मोफत औषधे वाटप करण्यात आली . यावेळी श्री दत्त क्लिनिक व आयुर्वेदीक पंचकर्म चिकित्सालय तज्ज्ञ डॉक्टर,आयुर्वेदिक फार्मा कंपनीचे सहकारी तसेच गावातील तरुण प्रज्वल भाजीपाले , अभिषेक गणोरकर,सचिन बारोकार,पवन येनकर,भूषण बंड, प्रभुदास बोंबटकार ,उमेश इंगळे,सुरज भाजीपाले, वैभव तायडे यांनी विशेष भाग घेत अनमोल साथ दिली.दरम्यान, पहिल्या श्रावण सोमवारी झालेल्या मोफत आरोग्य शिबिराने अनेक लक्षण ग्रस्त रुग्णांना दिलासा मिळाला आहे.