विकास ठाकरे
तालुका प्रतिनिधी अकोला
अकोला : वंचित बहुजन आघाडी अकोला वतीने जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे यांच्या नेतृत्वाखाली साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त स्थानिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे रेल्वेस्थानक चौक येथे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. ह्यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पश्चिम विदर्भ महासचिव बालमुकुंद भिरड, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, महिला जिल्हाध्यक्ष प्रभाताई शिरसाट, अॅड संतोष राहाटे, निलेश देव, गजानन दांडगे, प्रदिप उर्फ बबलु शिरसाट, दिपक गवई, जि. प. सदस्य शंकरराव इंगळे, सह जिल्हा प्रसिध्दी प्रमुख विकास सदांशिव, शरद इंगोले, गजानन तायडे, इंजि. शुभांगी आशिष सोनोने, अमोल कलोरो, सुरेश कलोरे गंगाधर सावळे, संतोष वाघमारे, बाबुराव अवचार, रमेश वानखडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


