डॉ.शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.
परभणी : दि.23
कविता जगण्याचा अर्क असतो. कविता जगण्याचे सार्थक असते. केशव बा. वसेकरांनी कवितेशी संघर्ष केला. त्यांना कितीही छळले तरी त्यांनी तिच्यावर न रागवता केशव बा. वसेकर स्वतः कविता झालेला माणूस आहे. असे प्रतिपादन प्रसिद्ध विचारवंत रावसाहेब कसबे ( नाशिक ) यांनी केले. ते केशव बा. वसेकर अमृतमहोत्सव समारंभात बोलत होते. प्रतिभा ही माणसांनी कमावलेलं कौशल्य…समाजात चाललेला उत्पात,वाईट गोष्टी यांच्यबद्धल अंतकरणात विद्रोह आहे.तो शब्दातून व्यक्त करतो तो साहित्यिक,चित्रातून व्यक्त करतो तो चित्रकार प्रत्येक जण आपापल्या परीने आपापल्या कलेतून आपली प्रतिभा व्यक्त करत असतो आणि या प्रतिभेतूनच खऱ्या अर्थाने जगण्याचा अर्थ प्राप्त होतो.प्रतिभा ही माणसाला मिळालेली देणगी नसून हे माणसांनी कमावलेलं सगळ्यात मोठं कौशल्य आहे.असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध कवी – चित्रकार भ.मा. परसवाळे हे होते. तर मंचावर सत्कारमुर्ती केशव बा. वसेकर, ताराबाई केशव वसेकर, कार्यक्रमाचे निमंत्रक प्रा. विश्वास वसेकर, कवी इंद्रजित भालेराव हे होते. पुढे बोलताना रावसाहेब कसबे म्हणाले की, ‘ परभणी ची भूमी ही सुपिक आहे. परभणीतील साहित्यिक कवी केशव बा. वसेकर, कवी इंद्रजित भालेराव, कथाकार डॉ. आसाराम लोमटे यांनी परभणी हे साहित्याचं केंद्र केले आहे. केशव बा. वसेकरां सारख्या उगवलेल्या साहित्यिकांना मोठे करणे ही तुम्हा परभणीकरांची जबाबदारी आहे. आपला शेतकरी प्रामाणिक आहे. शेतकऱ्यां बद्दलची कृतज्ञता आपल्या लेखनातून यायला हवी असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कवी प्रा. इंद्रजित भालेराव यांनी केले. प्रा. भगवान काळे यांनी शब्दांकन केलेल्या मानपत्राचे वाचन अरूण चव्हाळ यांनी केले. सुत्रसंचलन त्र्यंबक वडसकर यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. नवीन वसेकर यांनी केले. कार्यक्रमास साहित्य, शिक्षण, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीते -साठी पवन वसेकर, विष्णू सोळंके नवीन वसेकर, कृष्णा सोळंके यांच्यासह अमृत महोत्सव सोळा समितीच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.