कैलास खोट्टे
तालुका प्रतिनिधी संग्रामपूर
संग्रामपूर : राज्य शासनाच्या महाराजस्व अभियानांतर्गत शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासन दरबारी उपक्रम राबवत आहे. यासाठी तालुक्यातील श्री संत गुलाबबाबा संस्थान, काटेल धाम येथे २९ मे च्या आयोजनासाठी उपविभागीय अधिकारी शैलेश काळे व तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांनी संस्थेत जाऊन संस्था संचालकांशी चर्चा केली. शासकीय योजना लोकाभिमुख करून त्यांची गतिमानपणे अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने २९ मे रोजी काटेल धाम येथे या अभियानाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी शैलेश काळे यांनी दिली. या उपक्रमाचा तालुक्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. शासनाच्या या उपक्रम अंतर्गत सर्व तालुक्यांमध्ये शासनाच्या सर्व योजनांचा लाभ नागरिकांना घेता येणार आहे. यामध्ये नवीन शिधापत्रिकेचे अर्ज स्वीकारणे, रेशन बुकमधील नावे कमी करणे किंवा वाढवणे, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत, वृद्ध विधवा, अपंग यांचा समावेश आहे. , राष्ट्रीय पेन्शन सेवा योजना , नवीन वीज जोडणी अर्ज स्वीकारणे , वीज बिल दुरुस्ती , नवीन मतदार नोंदणी ,जात प्रमाणपत्र , जन्ममृत्यू नोंदणी व विवाह नोंदणी प्रमाणपत्र, अपंगत्व प्रमाणपत्र,अशा विविध शासकीय योजना नागरिकांसाठी उपलब्ध असतील. त्यासाठी आज उपविभागीय अधिकारी शैलेश काळे, तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांनी श्री संत गुलाबबाबा संस्थानचे संचालक यांच्याशी चर्चा करून जागेची पाहणी केली.