शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी
100% महिला सदस्य निवडीचा आदर्श निर्माण.सेलू :जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खवणे पिंपरी तालुका सेलू येथे आज दिनांक २० डिसेंबर रोजी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य निवड प्रक्रिया पार पडली. शिक्षकांनी शाळेच्या हितासाठी केलेल्या आवाहनाला गावकरी व समस्त पालकांनी सकारात्मक प्रतिसाद देत शाळा व्यवस्थापन समिती संपूर्ण सदस्य बिन विरोध निवडण्यात आले. मुख्य आणि विशेष बाब ही, की संपूर्ण सदस्य ‘महिला’ म्हणून निवडून आज समाजासमोर खवणे पिंपरी गावकऱ्यांनी आदर्श निर्माण केला आहे.प्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष म्हणून जना नितीन चव्हाण, उपाध्यक्ष म्हणून अनिता अशोक मुळे यांची सर्व सदस्या मधून निवड करण्यात आली.अध्यक्ष,उपाध्यक्ष व सर्व सदस्य, शिक्षण तज्ज्ञ, यांच्या निवडीचे खवणे पिंपरी येथील सरपंच,उपसरपंच,पोलीस पाटील, ग्रामसेवक,पोलीस अधिकारी पवार साहेब,सोसायटी सदस्य या सर्वांनी निवडलेल्या सदस्यांचे अभिनंदन केले.संपूर्ण निवड प्रक्रियेचे काम काज मुख्याध्यापक गिरीश कुलकर्णी, शिक्षक ज्ञानोबा कटारे,संतोष पडोळे, आत्मलिंग लांडगे, नवनाथ सोळंके, सचिन आठवले, संतोष सुकनुर, वाघ मॅडम आदींनी पार पाडले.