गजानन डाबेराव ग्रामीण प्रतिनिधी नांदुरा
नांदुरा:- नुकत्याच आलेल्या केंद्र सरकारच्या नियुक्तीपत्रात सर्व साधारण शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांची महाराष्ट्रातून 8 वा क्रमांक घेऊन नियुक्ती झाली आहे. यामध्ये नांदुरा येथील प्रसाद रामेश्वर औतकार या सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्याने महाराष्ट्र सुरक्षा बल एम एस एफ ची सेवा 4 महिने आधीच सुरू केली होती.अशातच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (सीआयएसएफ)च्या नुकत्याच लागलेल्या यादीमध्ये सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन महाराष्ट्रातून आठवा क्रमांक मिळवत प्रसाद रामेश्वर औत्कार याची नियुक्ती झाल्याने मलकापूर विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय माजी आमदार राजेशजी एकडे,कृषी उत्पन्न बाजार समिती नांदुराचे सभापती भगवानभाऊ धांडे, संचालक पुरुषोत्तम झाल्टे, बंटीभाऊ फणसे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस निलेश पाऊलझगडे,नांदुरा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष सुधीरभाऊ मुर्हेकर, भाजपा नेते शिवाजीराव पाटील, मल्हार सेनेचे जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न पाचपोर,नांदुरा पंचायत समिती माजी सभापती ओंकारभाऊ जवकार, निमगावचे माजी सरपंच श्रीकृष्ण इंगळे, रामपूर माजी सरपंच पुंजाजी पाटील, यज्ञेश्वर पाटील, नगरसेवक प्रमोदभाऊ गायकवाड,अजयभाऊ भिडे, संदीप बापू देशमुख,नांदुरा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत मोरे, पोलीस हेडकॉन्स्टेबल श्याम आघाव, शैलेश बहादुरकर,प्राथमिक आरोग्य केंद्र नांदुराचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ श्याम चंदनगोळे,सौ अर्चनाताई चंदनगोळे यांचेसह अनेक मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन सदर सीआयएसएफ जवानाचे अभिनंदन केले. यावेळी सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातील अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा सीआयएसएफ मध्ये नियुक्ती झाल्याने त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.