मधुकर बर्फे तालुका प्रतिनिधी पैठण
पैठण.परभणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची झालेली विटंबना तसेच पोलिस कोठडी अमानुषपणे मारहाण दरम्यान आंदोलक भीम सैनिक सोमनाथ व्यंकट सुर्यवंशी यांचा मृत्यु व केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ २० डिसेंबर शुक्रवार रोजी पैठण तहसील कार्यालयासमोर तालुकास्तरीय सर्व पक्षाच्या तसेच समाज बांधवांच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत तब्बल तीन तास ठिय्या आंदोलन करून तीव्र निषेध व्यक्त केला.परभणी येथे भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाल्यानंतर या घटनेच्या विरोधात आंदोलन करणारे आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणी मुळे पोलीस कोठडीत मृत्यु झाला त्यांच्या मृत्युची (सि बी आय) चौकशी करून त्यांच्या कुटुंबास आर्थिक मदत म्हणुन एक कोटी रुपये देण्यात यावे. सदरील प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे.त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नौकरीत सामाविष्ट करून घेण्यात यावे. या मागणी सोबतच पोलीस कोठडीत आंदोलक सोमनाथ सुर्यवंशी यांना ज्या पोलीसांनी मारहाण केली त्यांची नार्को टेस्ट करून दोषी पोलीस कर्मचाऱ्यांवर तात्काळ सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करत त्यांचे कायम निलंबन करण्यात यावे. तसेच भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणारा आरोपी मनोरुग्ण असल्याचा अहवाल देणाऱ्या डॉक्टरांची सखोल चौकशी करण्यात यावी.तसेच पोलिसांकडून आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे तात्काळ मागे घ्यावे व या आंदोलना दरम्यान गंभीर जखमी झालेल्या आंदोलकांना आर्थिक मदत देण्यात यावी.आदिं मागण्यांचे निवेदन पैठण तहसिल कार्यालयाला देण्यात आले. सदरील निवेदन नायब तहसीलदार बनसोडे यांनी स्वीकारले.यावेळी दशरथ आडसुळ,राजु गायकवाड,जगन्नाथ साळवे, नंदकिशोर मगरे,रावसाहेब आडसुळ,बाबासाहेब गायकवाड, संजय खडसन, पाथ्रीकर,सोमनाथ निकाळजे, अँड. सुभाष खडसन, प्रमोद सरोदे, कल्याण मगरे, भारत आठवले, प्रकाश पवार, ज्ञानदेव आडसुळ,गौरव आठवले, पंकज,राजु चाबुकस्वार, लखन कांबळे,गौतम सोनवणे, मयूर, विष्णु खंडागळे, रितेश पहिलवान,वाव्हूल प्रकाश पवार, मुक्तार भाई जहागीरदार,घाटविसावे, इस्माईल इनामदार रवी गायकवाड,देवा अहिरे, नंदू गरुटे, पपू पहिलवान, सुरेश सदावर्ते, कोल्हे, म्हस्के, बनसोडे, गिरी,पहिलवान यांच्या सह ठिय्या आंदोलनात महीला भगिनी व समाज बांधव बहुसंख्येने संख्येने उपस्थिती होती.