शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी
सेलू :सेलू तालुक्यातील जि.प.प्राथमिक शाळा निपाणी टाकळी येथे दि.20 रोजी बालकाचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अंतर्गत शाळा व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन करिव्ता माननीय शिक्षण अधिकारी प्राथमिक व गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती सेलू यांच्या आदेशान्वये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निपाणी टाकळी येथे शाळा व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन करण्यासाठी 16 डिसेंबर रोजी संवर्गनिहाय व वर्गनिहाय आरक्षण उपस्थित पालकांसमोर निश्चित करण्यातआले. दिनांक 20 डिसेंबर रोजी लोकशाही पद्धतीने पालकांमधून वर्गनिहाय व संवर्ग निहाय सदस्य बिन विरोध निवडण्यात आले निवडण्यात आलेल्या सदस्य मधून गुप्त मतदानाद्वारे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड करण्यात आली शाळा व्यवस्था पन समितीचे अध्यक्ष म्हणून लक्ष्मण आत्माराम शिंदे यांची निवड झाली तसेच उपाध्यक्ष म्हणून श्रीमती नसरीन मुजाहिद पठाण यांची निवड झाली निवड झाली समिती खालील प्रमाणे लक्ष्मण आसा राम शिंदे अध्यक्ष श्रीमती नसरीन मुजाहिद पठाण उपाध्यक्ष सदस्य म्हणून श्रीमती राधा जगन ठाकरे पूजा रवी कदम अविद्या दिलीप हरकळ सुनिता, शिवाजी पडुळे, सचिन बाबासाहेब सावंत, युसुफ रफिक शेख, मित्रिंदा संजय वाघमारे सोनाली गणेश गवारे, भाऊराव आसाराम हातडकर, सखाराम बाबाराव उबाळे व विष्णू माणिक गिराम आदी जणांचासमावेश आहे.यासाठी सरपंच सुनील सावंत उप सरपंच लहानाप्पा हरकळ, उपसभापती प्रकाशराव मुळे सुनील गिराम, भगवानराव सावंत, नितीन आजबे, बाळू गिराम, विकास गिराम, इतर मान्यवर उपस्थित होते. तसेच शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक यांनी सहकार्य केले.