गजानन डाबेराव ग्रामीण प्रतिनिधी नांदुरा
नांदुरा :- आजच्या आधुनिक धकाधकीच्या काळात आतिशबाजी व दिखाऊ कार्यक्रमांचे आयोजन करून वाढदिवस साजरा करण्याचा ट्रेंड सर्वत्र दिसून येत असताना या सर्व दिखाउपणाला फाटा देत नांदुरा पंचायत समिती अंतर्गत कार्यरत कृषी अधिकारी पंचायत प्रशांत जामोदे साहेब यांनी त्यांचे वडील सेवानिवृत्त शिक्षक समाधान बळीराम जामोदे यांचा ७५ वा वाढदिवस त्यांचे जन्मगाव निमगाव येथील स्पर्धा परीक्षेचे अभ्यास करणाऱ्या अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांना हजारो रुपयांची पुस्तके दिनांक २२ डिसेंबरला अभ्यासिकेत आयोजित कार्यक्रमात भेट देऊन साजरा केला. तसेच या अभ्यासिकेच्या माध्यमातून शासकीय नोकरीत दाखल झालेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांचा सत्कार त्यांनी या कार्यक्रमातून केला.त्यांच्या या समाजशील उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. नांदुरा तालुक्यातील निमगाव येथे शेतकरी पुत्र अभ्यासिका ही ग्रामपंचायत आवारातील सामाजिक सभागृहात मागील दहा वर्षांपासून कार्यरत आहे. परिसरातील विद्यार्थी येथे एकत्र येऊन स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात. त्यांना स्पर्धा परीक्षांची नवनवीन पुस्तके सहज उपलब्ध व्हावी व नवीन पुस्तकांच्या माध्यमातून त्यांचा उत्साह द्विगुणीत करण्यासाठी नांदुरा पंचायत समितीचे कृषी अधिकारी प्रशांत जामोदे यांनी त्यांच्या वडिलांचा ७५ वा वाढदिवस या अभ्यासिकेत साजरा केला. सेवानिवृत्त शिक्षक समाधान बळीराम जामोदे यांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा परीक्षेची हजारो रुपयांची पुस्तके जामोदे परिवाराच्या वतीने अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांना भेट देण्यात आली. यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निमगाव चे सरपंच विकास इंगळे होते तर या कार्यक्रमाला शेतकरी पुत्र अभ्यासिका हा उपक्रम सर्वत्र राबविण्यासाठी नेहमी पुढाकार घेणारे राजेश गावंडे, महात्मा फुले शिक्षण संस्थेचे सचिव सुहास वाघमारे, ग्रामपंचायत सदस्य जानराव इंगळे ,योगेश चावरे, महेंद्र भोपळे ,बाबुराव शिवलकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी अधिकारी प्रशांत जामोद यांनी केले. यावेळी अभ्यासिकेचे प्रणेते राजेश गावंडे यांनी सेवानिवृत्त शिक्षक समाधान जामोदे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त शाल व श्रीफळ देऊन त्यांचा गौरव केला. तसेच या कार्यक्रमात या अभ्यासिकेतून अभ्यास करणारे व शासकीय सेवेत रुजू झालेले दीपक गावंडे, प्रशांत तायडे ,सुनील वानखडे, रवींद्र सूर्यवंशी ,वैभव बोंबटकर, मनोज क्षीरसागर ,निंबाजी ढोले, शुभम राखोंडे ,भूषण चोपडे, जीवनपुरी, मयूर पाऊलझगडे ,राजेश गिरी नितीन बगाडे ,विवेक चोपडे, अमोल अवचार ,राजकुमार कुटे आदींच्या कार्याची व त्यांनी या अभ्यासिकेच्या माध्यमातून मिळवलेल्या यशाची माहिती देण्यात आली तसेच अभ्यासिकेच्या माध्यमातून शासकीय नोकरीला लागलेल्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अभ्यासिकेच्या माध्यमातून अभ्यास करून स्पर्धा परीक्षांमधुन शासकीय नोकरी त रुजू झालेल्या अभ्यासिकेच्या माजी विद्यार्थ्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. तसेच सत्कारमूर्ती समाधान बळीराम जामोदे सेवानिवृत्त शिक्षक यांनी स्पर्धा परीक्षांचे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना शासकीय नोकरीच्या माध्यमातून तळागाळातील नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर राहण्याचे मौल्यवान मार्गदर्शन केले. महात्मा फुले शिक्षण संस्थेचे सचिव सुहास वाघमारे यांनी स्पर्धा परीक्षांसाठी कठोर मेहनत सोबतच अभ्यासाचे योग्य नियोजन करण्याचा सल्ला दिला व शालेय स्तरावर स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शनाची गरज व्यक्त केली. कार्यक्रमाचे संचलन सहाय्यक कृषी अधिकारी प्रशांत जामोदे यांनी केले. वडिलांच्या वाढदिवशी अभ्यासिकेला पुस्तके भेट देऊन अभ्यासिकेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करून इतरांना प्रेरणा देणाऱ्या या आगळ्यावेगळ्या वाढदिवस सोहळ्याची चर्चा प ढरिसरात होत आहे. अभ्यासिकेने दिली त्यांच्या जीवनाला दिशा.नांदुरा तालुक्यातील निमगाव येथील शेतकरी पुत्र अभ्यासिकेच्या माध्यमातून अभ्यास करून गावातील आतापर्यंत सोळा विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून शासकीय नोकरी मिळाली असून या अभ्यासिकेने त्यांच्या जीवनाला दिशा दिली आहे. कृषी अधिकारी प्रशांत जामोदे यांनी त्यांच्या वडिलांच्या वाढदिवस दिनी शासकीय नोकरी मिळवलेल्या या अभ्यासिकेच्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार केला . या सर्व विद्यार्थ्यांच्या आयुष्याला या अभ्यासिकेने दिशा दिली असून त्यांच्या सत्काराने नवीन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळाले आहे.


