कैलास श्रावणे जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ
पुसद मा.इंद्रनिल नाईक यांची राज्यमंत्री,(उद्योग, सार्वजनिक बांधकाम, उच्च व तंत्रशिक्षण, आदिवासी विकास, पर्यटन, मृद व जलसंधारण) पदी नियुक्ती झाल्याबद्दल पुसद नगरीत प्रथम आगमना निमित्त स्वागत समारोह ईटावा वॉर्ड तसेच पुसद येथील नागरिकांनी आयोजन केले होते.सर्वप्रथम या स्वागत समारोहाची सुरवात माजी मंत्री स्व. सुधाकरराव नाईक साहेब यांच्या पुतळ्यापासून करण्यात आली. माननीय नामदार इंद्रनील नाईक सौ.मोहिनीताई नाईक, .विजय कनीराम जाधव पिंटूभाऊ हिराणी, श्रीराम पवार .करमरकर यांनी स्वर्गवासी सुधाकर नाईक यांच्या पुथळ्याला पुष्पहार अर्पण करून भव्य अशी रॅलीमध्ये सहभागी झाले.याप्रसंगी ईटावा वॉर्ड येथील नायक .हाजूसिंग चव्हाण यांनी माननीय आमदार .इंद्रनिल नाईक साहेब यांना शाल श्रीफळ देऊन सत्कार व स्वागत केले.तसेच ईटावा वॉर्ड येथील समाजसेवक . विजयभाऊ मेरसिंग राठोड यांनी आमदार .इंद्रनील नाईक साहेब यांना जेसीबी वरून भल्ल मोठ पुष्पहार अर्पण करून भव्य असे स्वागत केले.यावेळी ईटावा वॉर्ड परिसरातील ज्येष्ठ नागरिक .सुरेश राठोड मा. वनपाल, बंडूसिंग चव्हाण मा. वनपाल,.पी एम.चव्हाण मा. लिपिक पी. एन.कॉलेज पुसद .गोकुळ ठाकूरसिंग राठोड जनता शिक्षण प्रसारक मंडळ पुसद , टायपिंग इन्स्टिट्यूट पुसद येथील संचालक .अजमिरे साहेब, नगरपालिकेतील सेवानिवृत्त पाणीपुरवठा अधिकारी श्री.जमधाडे , पुसद बस स्थानकातील कर्मचारी . पंडित राठोड, वसंतराव नाईक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय पुसद येथील सहाय्यक शिक्षक .महेश सुभाष चव्हाण ईटावा वॉर्ड येथील योगायोग हॉटेल चे मालक.विनोद राठोड, राजेशभाऊ तुनगर, गजाननभाऊ माळोदे कैलास माडोळे व ईतर ईटावा वॉर्ड येथील नागरिक उपस्थित होते. या भव्य रॅलीमध्ये ईटावा वॉर्ड तसेच पुसद नगरातील नागरिक, व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


