प्रकाश कांबरे
तालुका प्रतिनिधी हातकणंगले
शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्राभोवतालचे अतिक्रमण कधी काढले जाणार या प्रश्नाचे उत्तर ८ वर्षानंतर अतिक्रमण काढून देण्यात आले व यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र अतिक्रमण मुक्त झाले.शिरोली पुलाची येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कंपाउंड कामास अडचण होणाऱ्या अतिक्रमण धारकांना अतिक्रमण लवकरात लवकर काढून घ्यावे यासाठी वारंवार सूचना देऊन सुद्धा ते अतिक्रमण काढून घेतले गेले नाही याच पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत ने ही स्वतः कारवाई केली आणि तेथील अतिक्रमण काढण्यात आले. राष्ट्रीय महामार्गाला लागुन असल्याने याचे विशेष महत्त्व आहे. त्यावेळी सरपंच प्रतिनिधी कृष्णात करपे व उपसरपंच अविनाश कोळी ग्रामपंचायत सदस्य विजय जाधव, मोहम्मद महात, श्रीकांत कांबळे, महादेव सुतार, आरिफ सर्जेखान, शिवाजी समुद्रे, संपत संकपाळ, योगेश खवरे त्याचबरोबर तंटामुक्ती अध्यक्ष सतीश पाटील व तंटामुक्ती सदस्य धीरज पाटील, श्रीधर पाटील, बाबासो बुधले, सर्जेराव चौगुले, सदाशिव संकपाळ, कृष्णात उनाळे, दिलीप तेलवेकर, संतोष यादव आदि उपस्थित होते.