रितेश टीलावत
ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
महाराष्ट्र शासन कृषी विभाग अन्न व पोषण सुरक्षा अन्नधान्य पिके अंतर्गत अकोट उपविभागामध्ये पौष्टिक तृणधान्यबद्दल जन जागृती कार्यशाळा तेल्हारा तालुक्यातील गोर्धा येथे आयोजित करण्यात आलेली होती.सन 2023-24 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून जगभरात साजरे होत असताना गोष्टीतून बांधण्याचे क्षेत्र वाढावे व त्याचप्रमाणे आहारा तील गोष्टी करून झाल्याचे महत्व लोकांना पटवून द्यावे या अनुषंगा ने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.तेल्हारा तालुक्यामध्ये यावर्षी ज्वारी पिकाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढलेले असल्यामुळे अधिक उत्पादन घेण्यासाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान व ज्वारी व इतर धरुन दाणे पिकातील किड नियंत्रण यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्य शाळेच्या अध्यक्षस्थान गावाच्या प्रथम नागरिक सरपंच सौ भारती रवीभाऊ थोरात त्यांनी भूषविले. कार्यशाळेमध्ये सर्वप्रथम सर्व उपस्थित महिला व पुरुष शेतकरी बंधूंना सौ रुपाली भांबुरकर विभाग प्रमुख, आहार अर्थशास्त्र विभाग डॉ.गोपाळराव खेडकर महाविद्यालय तेल्हारा यांनी नवजात बालकापासून ते वृद्धा पर्यंत पौष्टिक तृणधान्याचे आहारा तील महत्त्व, ज्वारी बाजरी भगर यापासून बनणाऱ्या विविध पदार्थ याबद्दल सखोल अशे मार्गदर्शन केले.यानंतर श्री कुलदीप देशमुख विषय तज्ञ कृषी शास्त्र विभाग कृषी विज्ञान केंद्र अकोला यांनी ज्वारी बाजरी लागवड तंत्रज्ञान, तृणधान्य पिकातील खत व्यवस्थापन व पाणी व्यवस्थापन याबद्दल उपस्थिती शेतकऱ्यां
सोबत हितगुज साधले.अनेक शेतकऱ्यांनी आपले विविध प्रश्न मांडून त्यांच्याकडून नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान जाणून घेतले.चांगल्या उत्पादनासाठी सॉरी पिकातील कीड नियंत्रण अत्यंत आवश्यक आहे त्याच अनुषंगाने डॉ पंजाब राव देशमुख कृषी विद्यापीठातील कीटक शास्त्रज्ञ डॉ प्रवीण राठोड यांनी ज्वारी पिकातील किड नियंत्रण, निंबोळी अर्काचा वापर, एकात्मिक कीड व्यवस्थापन या सर्व गोष्टीवर मार्गदर्शन केले.
कार्यशाळेचे प्रास्ताविकआयोजक म्हणून उपविभागीय कृषी अधिकारी अकोला तथा तालुका कृषी अधिकारी तेल्हारा गौरव राऊत यांनी केले. सदर कार्यशाळे चे सूत्रसंचालन कृषी सहाय्यक मनोजकुमार सारभुकन यांनी केले.
कार्यशाळेमध्ये सर्व उपस्थित शेतकरी महिला व पुरुष मंडळी यांना प्रशिक्षण साहित्य व पौष्टिक तृणधान्य जनजागृती माहिती पत्रिका वाटप करण्यात आली. या कार्यशाळेची संपूर्ण नियोजन गोर्धा येथील कृषी सहाय्यक महेश इंगळे प्रगतशील शेतकरी मुरलीधर वाकोडे यांनी केले. कार्यशाळेच्या शेवटी सर्वांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेऊन कार्यशाळा संपन्न झाली