रितेश टीलावत
ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा व कृषी विज्ञान केंद्र अकोला यांच्या संयुक्त विद्यमानाने ग्रामपंचायत कार्यालय येथे भरड धान्य प्रक्रिया उद्योग या विषयावर शेती शाळा प्रकल्प संचालक आत्मा अकोला डॉ. मुरली इंगळे , गौरव राऊत तालुका कृषी अधिकारी तेल्हारा यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सौ वैशालीताई वानखडे सरपंच , रमेश दुतोंडे उपसरपंच ग्रामपंचायत हिवरखेड ,तसेच सौ. सुलभाताई दुतोंडे, जिल्हा परिषद सदस्य तथा आत्मा समिती सदस्य, सौ गोकुळाताई भोपळे, सौ उज्वलाताई प्रवीण येऊल आत्मा समिती सदस्य हे उपस्थित होते प्रमुख मार्गदर्शक कृषी विज्ञान केंद्र अकोला येथील सौ कीर्तीताई देशमुख यांनी भरड धान्य प्रक्रिया उद्योग जसे ज्वारी ,बाजरी ,राई यापासून बनविण्यात येणारे पदार्थ तसेच आहारात भरड धान्याचा उपयोग त्याचे महत्त्व याविषयी सविस्तर असे मार्गदर्शन केले यावेळी सौ संगीता ताई इंगोले ,सौ संगीता संजय मोरखडे यांनी आपले मनोगत व्यक्तकेले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक मोगरे बीटीएम आत्मा यांनी केले


