भारत भालेराव
तालुका प्रतिनिधी, शेवगाव
शेवगाव:दि.18शहरातील जनशक्ती जुनियर कॉलेज व कोटा एक्सलन्स सेंटर, आनंदधाम रोड अहमदनगर येथे कोटा टॅलेंट सर्च परीक्षा 2023 मध्ये दहावीच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व करिअर मार्गदर्शन मेळावा उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. महेश खुस्पे, मोटिव्हेशनल स्पीकर व संचालक कोटा अकॅडमी कराड हे होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.शिव अग्रवाल डायरेक्टर कोटा सेंटर अहमदनगर यांनी केले. प्रमुख अतिथी श्री. लक्ष्मण बिटाळ मुख्य कार्यकारी अधिकारी कर्मयोगी आबासाहेब काकडे शैक्षणिक समूह यांनी पालक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.त्यांनी कोटा एक्सलेन्स सेंटर सुरू करण्यामागची पार्श्वभूमी व त्यानंतर बदललेली परिस्थिती, पालकांना व विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी,नीट व जेईई या परीक्षा संदर्भात माहिती दिली. संस्थेचे अध्यक्ष डॉ. विद्याधरजी काकडे साहेब व सौ. हर्षदाताई काकडे यांनी अथक प्रयत्न करून विद्यार्थ्यांची नीट व जेईई यासारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी गुणवत्ता पूर्ण महत्त्वाची सुविधा नगर शहरात उपलब्ध करून दिली आहे, त्या संधीचा फायदा पालक नक्कीच घेतील अशी आशा व्यक्त केली. “कोटा टॅलेंट सर्च २०२४” ही परीक्षा अहमदनगर शहर व नगर तालुक्यातील एकूण ५८ शाळांमध्ये आयोजित करण्यात आली होती.त्यामध्ये ३2०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. या महाविद्यालयातून प्रथम द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांचा व शाळांचे मुख्याध्यापक यांचा गुणगौरव सर्टिफिकेट व ट्रॉफी देऊन कार्यक्रमाचे अध्यक्ष खुस्पे यांच्या हस्ते करण्यात आला.अध्यक्ष भाषणामध्ये डॉ.महेश खुस्पे यांनी विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन केले. प्रतिकूल परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांनी खडतर मेहनत घेऊन यश कसे मिळवावे,आपल्या पाल्याकडून पालकांच्या काय अपेक्षा आहेत, MHT-CET,JEE व NEET या परीक्षांचा विद्यार्थ्यांनी कसा सामना करावा,विद्यार्थ्यांची देशातील इतर सर्व विद्यार्थ्यांशी कशी स्पर्धा आहे, अभ्यासाची नियोजन या बाबत उत्तम उदाहरण देऊन मोलाचे मार्गदर्शन केले. अहमदनगर शहरांमध्ये कोटा सेंटर सुरू करण्यात आले आहे, या संधीचा पालकांनी व विद्यार्थ्यांनी फायदा करून घ्यावा व आपला प्रवेश निश्चित करून,आपले डॉक्टर व इंजिनिअर होण्याचे स्वप्न या अकॅडमी द्वारे पूर्ण होईल अशी खात्री त्यांनी पालक व विद्यार्थ्यांना दिली. कोटा सेंटरचे विभाग प्रमुख श्री.हरीष खरड, डॉ. विकास गवळी, प्रा. जगन्नाथ बोडखे, श्री.शिवकुमार अग्रवाल, श्री.सागर गोपाळे, डॉ जयंत सूर्यवंशी,मेहेर मॅडम,हमिदा शेख, प्रा.म्हस्के सर, प्रा.बोरुडे मॅडम,शिंदे मॅडम उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्राध्यापिका प्रा रुस्कार शेख,अमोल देशमुख,मिलिंद चौथे,गणेश म्हस्के, सोपण उबाळे यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती समता नेवल यांनी केले व कार्यक्रमाचे आभार डॉ.विकास गवळी यांनी मानले.संस्थेचे सेक्रेटरी ॲड.विद्याधर काकडे, जि.प.सदस्य हर्षदाताई काकडे, श्री.पृथ्वीसिंग काकडे, मुख्यकार्यकारी लक्ष्मण बिटाळ, प्रा.विशाल पांडे यांनी शुभेच्छा दिल्या.