सिध्दार्थ कांबळे ग्रामीण प्रतिनिधी बिलोली
श्री निवासन रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त के. रामलु पब्लिक स्कूल कुंडलवाडी या शाळेत गणित दिवस व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी गणित दिवसाचे औचित्य साधून भौमितिक आकृत्या काढत उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माझी चीफ मॅनेजर दैना बँक तथा अय्यप्पा सेवा समिती कुंडलवाडीचे अध्यक्ष रमनाप्रसाद गुरुस्वामी तर प्रमुख अतिथी शिक्षण विस्तार अधिकारी जी.बी. बिरमवार सेवानिवृत्त गणिततज्ञ शिक्षक लक्ष्मण होरके अरविंद ठक्करवाड माजी सरपंच कासराळी डॉ.श्रुती यादवराव तुडमे प्रदेश सदस्य भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र राज्य हे उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्येची देवता सरस्वती व श्रीनिवासन रामानुजन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. शाळेतील विद्यार्थ्यांनी गणितावर आधारित नाटक व गीत सादर केले. या गणित दिवसानिमित्त विविध स्पर्धा परीक्षेत विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मेडल शील्ड व प्रमाणपत्र देण्यात आले. त्याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. शेवटी इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांनी काढलेल्या भौमितीक आकृत्याचे मान्यवरांच्या हस्ते रिबीन कापून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संतोष भाले यांनी केले तर आभार प्रदर्शन शाळेचे संस्थापक अध्यक्ष सायरेड्डी ठक्कुरवार यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.