सुरेश नारायणे तालुका प्रतिनिधी, नांदगाव
नाशिक जिल्हा कुस्तीगीर संघ व महाराष्ट्र कुस्तीगीर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने वर्धा येथे होणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा मुली निवड चाचणी बलकवडे व्यायामशाळा भगूर येथे घेण्याआली. या निवड चाचणीमध्ये कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील 03 खेळाडूंची महाराष्ट्र केसरी महिला क्रीडा स्पर्धा साठी निवड झाली. यशस्वी खेळाडू खालील प्रमाणे १)आशा सुरेश कांदे (वर्ग 12 वी)२) नारायणी भालचंद्र जोशी (वर्ग 12 वी)३) नीलम संतोष मोकळ (वर्ग 12 वी) यशस्वी विद्यार्थ्यांचे सत्कार मविप्रसंस्थेचे शिक्षण अधिकारी डॉ. नितीन जाधव, पिंपळगाव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ज्ञानोबा ढगे, कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय वनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस एन.शिंदे तसेच एस व्ही के टी महाविद्यालयाचे डॉ. प्रेमजी परमार या अतिथीनी सत्कार केला.यशस्वी खेळाडूंचे म.वि.प्र. संस्थेचे सरचिटणीस मा. श्री. नितीनभाऊ ठाकरे, म.वि.प्र. संचालक नांदगाव अमितभाऊ बोरसे पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.एन. भवरे,उपप्राचार्य डॉ. संजय मराठे व कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री राठोड डी.एम. तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवक यांनी यशस्वी खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन केले आणि महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. यशस्वी खेळाडूंना तंत्र व कौशल्याचे मार्गदर्शन महाविद्यालयाचे क्रीडा संचालक .लोकेश गळदगे आणि उपप्राचार्य व क्रीडा शिक्षक राठोड डी.एम. व क्रीडा विभाग सहाय्यक दिलीप अहिरराव यांचे लाभले.