शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी
सेलू: श्रीराम प्रतिष्ठान संचलित घटक संस्था एल.के.आर. रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूल, प्रॉस्परस पब्लिक स्कूल,उत्कर्ष विद्यालय आणि ज्ञानतीर्थ विद्यालय यांनी 52 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात उल्लेखनीय यश संपादन केले आहे.प्राथमिक गटातील यशप्रॉस्परस इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी कार्तिक परमेश्वर शिंदे व भागवत सुनील कदम यांनी “सायकल जनरेटर” या विषयावर सादर केलेल्या प्रयोगा साठी प्रथम क्रमांक मिळवला.याविद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिक्षिका सारिका ताठे यांनी केले. उत्कर्ष विद्यालय, सेलूच्या हर्षदा काष्टे व श्रेया चव्हाण यांनी “नैसर्गिक शेती” या विषयावर सादर केलेल्या प्रयोगासाठी तृतीय क्रमांक मिळ विला. त्यांना मार्गदर्शन शिक्षक विठ्ठल सरकटे यांनी केले.माध्यमिक गटातील यश एल. के.आर. रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या प्रणव मुजमुले व शशांक लगड यांनी “आरसी कंट्रोल व्हॉइस कार” या विषयावर सादर केलेल्या प्रयोगा साठी द्वितीय क्रमांक मिळवला. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन श्रीकृष्ण खरात यांनी केले.शैक्षणिक साहित्यातील यशज्ञानतीर्थ विद्यालय, सेलूचे शिक्षक नारायण बाबुराव चौरे यांनी विज्ञान शैक्षणिक साहित्य सादर करून माध्यमिक गटात प्रथम क्रमांक प्राप्त केला.या यशस्वी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजय रोडगे, सचिव डॉ. सविता रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्रा. महादेव साबळे, तसेच सर्व घटक संस्थांचे मुख्याध्यापक प्रिन्स इंग्लिश स्कूलचे कार्तिक रत्नाला, प्रॉस्परस पब्लिक स्कूलच्या प्रगती क्षीरसागर, उत्कर्ष विद्यालयाचे कैलास ताठे, आणि ज्ञानतीर्थ विद्यालयाच्या शालिनी शेळके, माध्यमिक मुख्याध्यापक हरीश कांबळे – यांनी केले. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही या यशस्वीतेसाठी आनंद व्यक्त केला आहे.