आनंद भदगै तालुका प्रतिनिधी पाथरी
पाथरी : पाथरी तालुक्यातील रामपुरी ते ढालेगाव रस्ता अगदी खड्डे मय व खडतर झाला आहे. येणाऱ्या जाणाऱ्याचे बेहाल झाल्याचे दिसत आहे. नादुरुस्त रस्ते आणि अपघात हे नेहमीचेच समीकरण आहे. उखडलेल्या खड्डेमुळे अपघात नेहमी होताना दिसत असतात .नागरिकांचा नाहक बळी जातो. तरीही प्रशासन ढिम्म असते. आता तर हिवाळ्याला सुरुवात झाली आहे धुई मुळे समोरचे काही दिसत नाही व अपघात होतात.ढालेगाव ते रामपुरी खु या मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे आहेत. चारचाकी वाहन चालकांचीही खड्डे टाळून वाहन पुढे नेताना तारांबळ उडत आहे. दिवसेंदिवस अपघातांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे या मार्गावरील खड्डे बुजवून रस्त्याचे नूतनीकरण करावे, अशी मागणी रामपुरी खु येथिल नागरिकांनी केली आहे.